कोरोना रूग्णांसाठी हॉस्पिटलकडून कोणत्या हॉटेलमध्ये रूमची सुविधा? Step down संकल्पना काय आहे?

कोरोना रूग्णांसाठी हॉस्पिटलकडून कोणत्या हॉटेलमध्ये रूमची सुविधा? Step down संकल्पना काय आहे?

खाजगी हॉस्पिटलसाठी जे बेड्स कोरोनाच्या आजारातून रिकव्हरी करताना ज्या रूग्णांकडून रिझर्व्ह केले जातात, त्या रूग्णांसाठी यापुढच्या काळात हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने स्टेप डाऊन या संकल्पनेअंतर्गतच फोर आणि फाईव्ह स्टार हॉटेलची व्यवस्था अशा रूग्णांसाठी केली आहे. त्यामुळेच जे रूग्ण हॉस्पिटलमध्ये रिकव्हरीला येतात, त्यांच्यासाठी हॉस्पिटलमधील बेड्स बिझी न राहता जे नवीन रूग्ण आहेत, अशा नव्या रूग्णांच्या ऑक्सिजनपासून ते आयसीयू यासारख्या उपचारासाठी या हॉस्पिटलमधील बेड्सचा वापर करण्यात येईल. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही संकल्पना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केली.

अनेक हॉस्पिटलमध्ये रूग्णांसाठी रिझर्व्ह असणाऱ्या बेड्ससाठी कोणतेही तातडीचे उपचार गरजेचे नसतात. अनेकदा कोरोनातून रिकव्हरीसाठी हे बेड्स रिझर्व्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अशा रूग्णांसाठी पंचतारांकित हॉडेलमध्ये व्यवस्था करून त्यांचे रिझर्व्ह बेड्स हे ज्या रूग्णांना तातडीचे उपचार गरजेचे आहेत अशा रूग्णांसाठी दिले जातील. मुंबईत सध्या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये एकुण ९५० रूम्स मुंबई महापालिकेकडून बुक करण्यात आले आहेत. याठिकाणी मी स्वतः जाऊन निरीक्षण करणार आहे, असे महापौरांनी सांगितले. या हॉटेलमधील रूग्णांसोबतच डॉक्टर्सही उपचारासाठी असणार आहेत, असेही महापौरांनी सांगितले. या हॉटेलमध्ये ज्या रूग्णांना रिकव्हरीची आवश्यकता आहे, अशा रूग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येईल. साधारणपणे ७ ते १० दिवस या रुग्णांना उपचार देण्यात येतील.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, खाजगी हॉस्पिटलशी कनेक्टेड हॉटेलला साधारणपणे २० रूम्स असाव्यात. ज्या हॉस्पिटलमध्ये रूग्णासाठी बेड्स रिझर्व्ह असतात अशा रूग्णांसाठी आता हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये रिकव्हरीसाठी बेड बुक करणाऱ्यांना स्टेप डाऊन सुविधेअंतर्गत हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येईल. या रूग्णांना वैद्यकीय देखरेखीची तितकीशी तातडीची गरज नसते. म्हणूनच या रूग्णांना स्टेप डाऊन सुविधेअंतर्गत उपचार देण्यात येतील.

अनेक मोठ्या हॉस्पिटलमधूनही राऊंड द क्लॉक अशा पद्धतीनेच स्टेप डाऊन सुविधा देण्यासाठी वेगळी टीमची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत खाजगी हॉस्पिटल हे दिवसाला ४ हजार रूपये बेडसाठी आकारते. तसेच ट्विन शेअरींग रूमसाठी हॉस्पिटलकडून ६ हजार रूपये प्रति दिवस आकारले जातात. हॉस्पिटलच्या चार्जेसशिवाय अतिरिक्त वैद्यकीय सुविधांमध्ये डॉक्टर्स व्हिजिट, इन्सिडेंटल चार्जेस अंतर्गतही पैसे आकारले जातात.

बॉम्बे हॉस्पिटलकडून इंटरकॉन्टिनेंटल (मरीन ड्राईव्ह) च्या हॉस्पिटला वापर स्टेप डाऊन सुविधेअंतर्गत करण्यात येणार आहे. तर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमार्फत ट्रायडंट (बीकेसी) हॉस्पिटला वापर हा स्टेप डाऊन फॅसिलिटीसाठी करण्यात येणार आहे.

मुंबई कुठे किती बेड्स ?

मुंबई महापालिकेने डॅशबोर्डवर कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्सची सुविधा देणार हे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये जसलोक हॉस्पिटलमध्ये २५० बेड्स महापालिकेला मिळाले आहेत. त्यामध्ये ४० आयसीयू बेड्स आहेत. तर सेवेन्स हिल्स हॉस्पिटलमध्ये २० (आयसीयू) बेड्स आहेत. नेस्को जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये १५०० अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी २०० आयसीयू बेड्स असतील. तर २०० ऑक्सिजन गरजेचा असणाऱ्या रूग्णांसाठीचे बेड्स असतील. मुंबई महापालिकेने गेल्या काही कालावधीत ३८०० बेड्स वाढवले आहेत, असेही महापौर म्हणाल्या.


 

First Published on: April 15, 2021 1:13 PM
Exit mobile version