या सगळ्या राजकारणात ‘शकुनी’ कोण? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

या सगळ्या राजकारणात ‘शकुनी’ कोण? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

जितेंद्र आव्हाडांनी विनयभंग केला असा आरोप एका महिलेने केला होता. त्यावरूनच मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. अशातच या सर्व प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांना अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) मंजूर झाला आहे. याच संदर्भांत जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी आव्हाड म्हणाले. पुलाच्या उदघाटनावेळी तिथे खूप गर्दी होती. त्या गर्दीत महिला एकट्याच येत होत्या. यावेळी मी त्यांना बाजूला केले आणि पुढे आलो. जर मी त्यांना बाजूला केले नसते तर मला पुढे जायला मिळाले नसते असं आव्हाड म्हणाले. किळसवाणा प्रकार प्लॅन करायचा आणि त्याला वरून आशीर्वाद मिळवायचे हा कहर आहे. बदनामीच षडयंत्र रचायचे आणि एखाद्याला राजकीय आणि सामाजिक जीवनात बदनाम करायचं यात कसला आनंद? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला.

मला अटक करण्यात आली त्यावर कोर्टाकडूनच सांगण्यात आले की अटक करण्याच्या प्रक्रियेमध्ये चूक आहे. असं कोर्टाने सांगितले असल्याचे आव्हाड (jitendra awhad) म्हणाले. संपूर्ण व्हिडीओ उपलब्ध आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी व्हिडीओ पाहणे गरजेचे होते असं आव्हाड म्हणाले. ३५४ कलम केव्हा लावले जाते याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. काहीही न वाचता वरून दबाव आला म्हणून एखाद्यावर गुन्हा दाखल करायचा हे चुकीचे आहे. पोलिसांना वरून कोण दबाव देत हा सुद्धा मला प्रश्न पडला जर का पोलिसांना वरून दवाब येतो असं म्हटले जाते तर मग कायदा बाजूलाच राहतो. असंही आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्रात असं राजकारण कधी पाहिलं नव्हतं. महाभारतासारखं राजकारण केलं गेलं पण यातला शकुन कोण आहे हे मला माहित नाही. याच संदर्भात आव्हाड पुढे म्हणाले, मी माझ्या वकिलांना सांगत होतो की मला जामीन नको पोलिसांना जर मला अटक करायची असेल तर करू देत. १० ते १५ दिवस तुरुंगात राहावं लागलं तर काही बिघडत नाही. पण या अश्या गुन्ह्यांसाठी जामिनासाठी भीक मागणं मला पटत नाही. पण शेवटी कुटुंबाचं आणि कार्यकर्त्यांचं ऐकावं लागतं

माझी अस्वस्थता अजूनही शांत झाली नाही
आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यासंदर्भांत बोललं जात होतं यावर आव्हाड म्हणाले की माझी अस्वस्थता अजूनही शांत झाली नाही. मला या जामीनाचा अजिबात आनंद झालेला नाही. मी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम आहे असं आव्हाड म्हणाले.


हे ही वाचा – राजकीय हेतूने कारवाई नको, जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन

First Published on: November 15, 2022 5:26 PM
Exit mobile version