पत्रकार ते शिवसेना नेत्या… व्हायरल व्हिडिओने चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रेंचा ‘असा’ आहे प्रवास

पत्रकार ते शिवसेना नेत्या… व्हायरल व्हिडिओने चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रेंचा ‘असा’ आहे प्रवास

सध्या राज्याच्या राजकारणात व्हायरल व्हिडीओ प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे चर्चेत आहेत. शितल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरेंवर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण सोशल मीडिवरील ज्या पेजवरून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे, ते मातोश्रीचे फेसबुक पेज असल्याचे शीतल म्हात्रेंनी सांगितले. दरम्यान, या व्हिडीओमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या शीतल म्हात्रे या नेमक्या आहेत कोण हे जाणून घेऊयात…

सध्या चर्चेत असलेल्या शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या आणि प्रवक्त्या आहेत. शिवसेनेतील बंडखोरीआधी शीतल म्हात्रे मूळ शिवसेनेत होत्या. ज्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. परंतु, शिवसेना आमदारांच्या बंडानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या. शीतल म्हात्रे या माजी नगरसेविका आहेत. उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर 8 मधून त्यांची दोन वेळा नगरसेविक म्हणून निवड झाली होती. (who is sheetal mhatre read in marathi)

राजकारणात येण्याआधी त्या एक महिला पत्रकार म्हणून सक्रिय होत्या. शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्या 10 ते 15 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. शीतल म्हात्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. शीतल म्हात्रे या अलिबाग आणि पेण येथील शिवसेनेच्या माजी संपर्कप्रमुख आहेत. त्यांनी दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

दोन जणांना अटक

शितल म्हात्रे यांचा व्हिडिओ फॉरवर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडिओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण

शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकरा समोर आला आहे. कांदिवली येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता याला अटक देखील करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘मातोश्रीतून युवा सेनेच्या टीमला फोन केले गेले आणि…’ नरेश म्हस्केंचे अप्रत्यक्षरित्या ठाकरेंवर आरोप

First Published on: March 12, 2023 7:45 PM
Exit mobile version