खरा मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे? – प्रकाश आंबेडकर

खरा मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे? – प्रकाश आंबेडकर

राज्यात वाढीव वीज बिलावरुन विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. सोमवारी भाजपने वाढीव वीज बिलांची होळी आंदोलन केले. तर आता वंचित बहुजन आघाडीने देखील ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत? उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. शिवाय, वाढीव वीज बिलांच्या माफीवरुन सरकारने घूमजाव केले आहे. ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच, वीज पुरवठा खंडीत केल्यास वंचित पुन्हा वीज जोडणी करणार, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील आक्रमक झाले आहेत.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे याचेही उत्तर सरकारने द्यावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महावितरणाचे अधिकाऱ्यांनी हे सांगितले आहे की लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंगसाठी दिलेले कंत्राट स्थगित केले नव्हते. त्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडिंगच्याबाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे असेही महावितरणने सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र २०१४ ला ही थकबाकी निम्म्याहून कमी होती असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. वीज बिल माफीवरुन या सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे. कारण एप्रिलपासून जी बिले आली आहेत त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

First Published on: November 23, 2020 3:01 PM
Exit mobile version