देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना गैरहजेरी का? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना गैरहजेरी का? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये काहीतरी बिनसल्याचही बोलल जात आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून आऊट करत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय सुरु आहे? यावरील राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगतायत. यातच देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे गैरहजर राहत असल्याचही काही वेळा पाहायला मिळालं. याच मुद्द्यावरून आज पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना सवाल केला. ज्यावर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका मांडली आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणार महत्त्वाचं स्थान मिळणार अशी चर्चा रंगली, मात्र ही गोष्ट केवळं चर्चांमध्येच राहिली. तेव्हापासून पंकजा मुंडे पक्षावर आणि पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा रंगतेय. स्वत: पंकजा मुंडे यांनी 2019 मध्ये राज्यतील सत्तास्थापनेच्या गोंधळादरम्यान आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. तेव्हापासून पंकजा मुंडे खरचं नाराज आहे का? यावरून राजकारण रंगले.

पंकजा मुंडेंचा भाजपकडून अपमान होत असल्याने ठाकरे गटाने त्यांनी पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती, त्यावरील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या मनात कोणतीही खदखद नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच यावर उत्तर दिलं आहे. तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात कोणताही खदखद नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहणं अपेक्षित नव्हतं, म्हणून मी तिथे आले नाही. आज माझे प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यामुळे मी आले. जे.पी.नड्डा जेव्हा आले तेव्हाही मी आले. मी भाजपाची सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमांना जाणं मला बंधनकारक वाटत नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.


पुण्यात मुलावर लैंगिक अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

First Published on: January 20, 2023 12:12 PM
Exit mobile version