Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे पुण्यात मुलावर लैंगिक अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात मुलावर लैंगिक अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

Subscribe

खडक परिसरात राहणाऱ्या दोघा जणांनी हे कृत्य केले. ते शेजारीच राहणाऱ्या मित्राच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत होते. हा खेळ कोणाला सांगू नको, असे ते त्याला सांगायचे. मात्र शारीरिक त्रास अधिकच झाल्याने मुलाने हा प्रकार आईला सांगितला. हे कृत्य कळाल्यानंतर मुलाच्या आई वडिलांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून याची तक्रार केली. पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

पुणेः मित्राच्या मुलावर तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. पुणे येथील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

खडक परिसरात राहणाऱ्या दोघा जणांनी हे कृत्य केले. ते शेजारीच राहणाऱ्या मित्राच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत होते. हा खेळ कोणाला सांगू नको, असे ते त्याला सांगायचे. मात्र शारीरिक त्रास अधिकच झाल्याने मुलाने हा प्रकार आईला सांगितला. हे कृत्य कळाल्यानंतर मुलाच्या आई वडिलांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून याची तक्रार केली. पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित मुलाचे वडील हे चांगले मित्र आहेत. आई वडील कामाला गेल्यानंतर आरोपी मुलाला गोड बोलून किंवा कसले तरी अमिष दाखवून घरी बोलवायचे. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे. हा प्रकार घरी सांगितलास तर तुझे वाईट होईल, असे आरोपी मुलाला धमकवायचे. तीन महिने हा प्रकर सुरु होता. अखेर वेदना असहाय्य झाल्याने मुलाने १५ जानेवारीला हा प्रकर आईला सांगितला.

गेल्या काही दिवसांत पुणे येथील लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील गुलटेकडी  परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. चहाविक्री करणाऱ्या आपल्या बाबांना ही अल्पवयीन मुलगी जेवणाचा डबा द्यायला जात होती. बाबांना डबा देऊन ती पुन्हा घरी परतत होती. त्यावेळी एका अज्ञात आरोपीने त्या मुलीचं अपहरण केलं. अपहरण करून तिला नराधमानं पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहा जवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर याच खोलीमध्ये आरोपीने तिच्यावर हैवानी कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

अशा घटनांमुळे पुण्यातील मुले व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -