ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली? यावर राहूल गांधी यांचे भाष्य

ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली? यावर राहूल गांधी यांचे भाष्य

Lucknow: Congress President Rahul Gandhi and party general secretaries Priyanka Gandhi Vadra and Jyotiraditya Scindia during their roadshow in Lucknow, Monday, Feb. 11, 2019. (PTI Photo) (PTI2_11_2019_000221B)

काँग्रेसमध्ये तब्बल १८ वर्षे काम केल्यानंतर काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपची वाट पकडली. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस का सोडली यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण ओळखतो. त्यांचे विचार आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे ते का सोडून गेले हेही आपल्याला माहीत असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी म्हणाले की, ‘एकीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरीकडे भाजपा-आरएसएसची विचारधारा आहे. त्यामुळे ही विचारधारेची लढाई आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची विचारधारा मला माहीत आहे. आम्ही दोघे एकत्र कॉलेजमध्ये होतो. आमची चर्चा झाली. त्यांना मी चांगल्याप्रकारे ओळखतो. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या राजकीय भविष्याची भीती वाटली आणि त्यांनी आपली विचारधारा खिशात घातली. त्यांनी आरएसएसची कास धारली. ‘ज्योतिरादित्य शिंदे यांनी १० मार्च रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ११ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयावर राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं.

ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात काय मिळणार, यावरही बोलताना राहुल म्हणाले की, ‘ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात मान-सन्मान मिळणार नाही. एवढचं नाही तर त्यांच्या मनाला समाधानही मिळणार नाही’, असेही ते बोलले.

First Published on: March 12, 2020 9:15 PM
Exit mobile version