दोन महिन्यात नारायण राणेंचे मंत्रिपद जाणार? ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा दावा

दोन महिन्यात नारायण राणेंचे मंत्रिपद जाणार? ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा दावा

कुडाळ : उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद तसा १८ वर्ष जुणा असला तरी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून या वादात अजूनच भर पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड करून बीजेपीसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप करताना दिसत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपा आणि नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल करताना मोठे भाकीत केले आहे.

हेही वाचा – ‘संभाजीनगरमधील दंगलीसाठी समाजसंकटांना खुली सुट; राममंदिर आणि दंगल रोखण्यासाठी फक्त १५ पोलीस’

वैभव नाईक म्हणाले की, येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचे केंद्रिय मंत्रीपद जाणार आहे आणि हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. नारायण राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचे भाजपाने काम दिले होते आणि ते काम आता संपलेले आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.

नाईक यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातून नारायण राणेंना माझ्या विरोधात त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र जनतेचा कौल उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे राणे जनतेच्या मनात माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – काळजी घ्या : जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार; ‘या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार चाचणी

शिंदे गटात जे आमदार गेले आहेत ते पुन्हा ठाकरे गटात येण्याचा प्रयत्न करत असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येतील. कारण ठाकरे गट सोडून गेल्यानंतर त्यांना त्यांची खरी परिस्थिती समजली असल्याचा दावाही वैभव नाईक यांनी केला.

शिवसेनेतील बंड
शिवसेनेतले क्रमांक दोनचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदारही नॉट रिचेबल असल्याची बातमी 21 जून २०२२ रोजी समोर आली. सुरूवातीला दहा आमदार, मग पंधरा आमदार आणि असे करत २० पर्यंत ही संख्या वाढत गेली. हे सगळे जण सुरतमध्ये आहेत ही माहिती समोर आली. २२ जून रोजी एकनाथ शिंदे यांचं बंड तीव्र झालं. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार सुरतहून गुवाहाटीला निघाले. कार, बसमधून निघत एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन दिलेले आमदार हे सुरत विमानतळावर पोहचले. त्यानंतर हे सगळे आमदार गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमधे पोहचले. त्यानंतर शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडूही गुवाहाटीत पोहचले. गुवाहाटीत पोहचल्यानंतर आपल्यासोबत ४० आमदारांचा दावा केला आणि शिवसेनेला आव्हान केले होते.

First Published on: April 1, 2023 5:30 PM
Exit mobile version