म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीही होऊ शकते चौकशी

म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीही होऊ शकते चौकशी

अनिल देशमुख, गृहमंत्री

राकेश मारिया यांच्या आत्मचरित्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेले आरोप तपासणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्य सरकार मार्फत देवेंद्र फडणवीस यांची संपुर्ण प्रकरणात काय भूमिका होती हे तपासले जाईल असेही त्यांनी सांगितले. माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या आत्मचरित्राचा दाखला घेऊन ते बोलत होते. गरज पडल्यास देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी लावू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

राकेश मारिया यांनी आत्मचरित्रात नमुद केलेली सगळी माहिती जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. राकेश मारिया यांच्याशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेला प्रकार जाणून घेणार आहोत असे देशमुख म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुस्तकातून करण्यात आलेल्या आरोपांबाबतही आम्ही बोलणार आहोत.

म्हणून राकेश मारिया गप्प होते

मुंबई पोलिस आयुक्त पदावरून बदली करून 2015 मध्ये महाराष्ट्र होमगार्ड विभागाची जबाबदारी दिल्यावर राकेश मारिया यांनी शांत राहणे पसंत केले होते. पण अखेर पुस्तकातून त्यांनी आपल मन व्यक्त केले आहे. शिना बोरा प्रकरणात त्यांनी आपल्या ‘लेट मी सेट इट नाऊ’ या पुस्तकातून काही गोष्टींचा खुलासा करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यावरही आरोप केले आहेत. २०१५ च्या शीना बोरा हत्याकांडाच्या चौकशीत तत्कालीन सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती हे आरोपी पीटर मुखर्जी आणि त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना ओळखत असल्याची माहिती सुरूवातीला लपवली होती. तसेच संपुर्ण प्रकरणावरून झालेल्या बदलीबाबतही त्यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

First Published on: February 19, 2020 3:07 PM
Exit mobile version