वाऱ्याचा वेग मंदावला, मुंबईसह संपूर्ण राज्यात वायू प्रदूषणात वाढ

वाऱ्याचा वेग मंदावला, मुंबईसह संपूर्ण राज्यात वायू प्रदूषणात वाढ

वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे.

मुंबई- वाऱ्याचा वेग मंदावल्याने महाराष्ट्रातील प्रदूषणात ऐन हिवाळ्यात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खराब ते अतिशय खराब अशी नोंदली गेली आहे. बंगालच्या उपसागरावरून येत असलेले बाप्ष, संथ वाहणारे वारे आणि आगीचे स्त्रोत यांमुळे वातावरणात प्रदूषणकारी कणांचे प्रमाण वाढले आहे, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येतंय.

हिवाळ्यात महाराष्ट्रात कमी प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, वाऱ्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात उत्सर्जित होणारे कण वेगाने वाहून जात नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. उत्तर भारतात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत येमारे धुराचे लोट हिमालयामुळे अडले जातात. त्यामुळे दिल्ली आणि लगतच्या क्षेत्रातव वायू प्रदूषण होते. मात्र, याचा फटका महाराष्ट्राला बसत नाही. परंतु, यावेळे प्रदूषणात वाढ झाली आहे.

काय आहेत कारणं?

आजारी माणसांनी काळजी घ्यावी

वायू प्रदूषणात वाढ झाल्याने दृष्यमान कमी होते. तसंच, आजारांतही वाढ होते. त्यामुळे श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर घराबाहेर न पडण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला गेला आहे.

First Published on: December 7, 2022 8:47 AM
Exit mobile version