विधानसभेत मणिपूर मुद्दा मांडू न दिल्यामुळे महिला आमदार आक्रमक

विधानसभेत मणिपूर मुद्दा मांडू न दिल्यामुळे महिला आमदार आक्रमक

मुंबई |  मणिपूर घटनेवर विधानसभा अध्यक्षांनी बोलू दिले नाही, असा आरोप महिला आमदारांनी केला आहे. यानंतर विरोधकांनी सभात्याग करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.  पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मणिपूर विषय मांडण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी बोलून न दिल्याचा आरोप करत विधानसभा सभात्याग केला.

“मणिपूर विषयावर विधानसभा अध्यक्षांना पाच मिनिट बोलण्याची विनंती केली. यावर अध्यक्षांनी मणिपूरची माणुसकीला काळिंबा फासणारी घटनेवर बोलून दिले नाही, असा आरोप काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केला. पुढे म्हणाल्या, “विधानसभा अध्यक्षांनी बोलून दिले नाही. सतत्यांनी विनंती करून देखील सभागृह अध्याक्षांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. म्हणून आम्ही सभात्याग करून बाहेर आलो आहोत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.”

देशात महिलांचा सन्मान होत नाही – यशोमती ठाकूर

” आपण खरेच लोकशाहीमध्ये राहतोय का की हुकूमशाहीमध्ये” असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित आहेत. “महिलांचा या देशांत सन्मान होत नाही, देशात असेच सुरू राहिले तर मोठे महाभारत घडणार आहेत, असे संकेत त्यांनी दिले. “विधानसभेत मणिपूरच्या घटनेवर बोलण्याचा मुद्दा उचलला होता. पण अध्यक्षांनी बोलून दिले नाही, मणिपूर हे देशाचा एक भाग आहे. आपण खरेच लोकशाहीमध्ये राहतोय का की हुकूमशाहीमध्ये, असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.

हेही वाचा – Manipur Violence : पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

जगामध्ये मणिपूरची घटना प्रतिमेचा विषय – प्रणिती शिंदे

“मणिपूरची घटना ही जगामध्ये देशाच्या प्रतिमेचा विषय झाली आहे”, असे काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंनी म्हटले आहे. “मणिपूरची घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. मोदी सत्तेत आल्यापासून देशात महिलांवरील अत्याचार वाढले असून केंद्र  सरकार सत्तेत आल्यापासून देशाची अधोगती झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या, “मणिपूरचा मुद्दा जगामध्ये देशाच्या प्रतिमेचा विषय आहे. मणिपूरची घटना मुद्दा मांडण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी विरोधकांना नकार दिला. यामुळे सत्ताधाऱ्यांना या विषयाचे गांभीर्य नाही.

 

First Published on: July 21, 2023 12:17 PM
Exit mobile version