सलाइनमध्ये अळी सापडल्याने खळबळ

सलाइनमध्ये अळी सापडल्याने खळबळ

प्रातिनिधिक फोटो

दोन वर्षांच्या मुलाला सलाइनद्वारे इंजेक्शन देताना बाटलीत अळी आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवून रुग्णाच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टर, परिचारिका, औषधी भांडार आणि औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. संबधितांवर जेलरोड पोलिसांत संबंधितांविरोधात गुन्हा करण्यात आला.

कशी घडली घटना

या घटनेनंतर दत्तात्रय चव्हाण (३६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांचा मुलगा पृथ्वीराज याला थंडी-ताप आणि सर्दी झाल्याने त्याला ३१ ऑक्टोबर रोजी रात्री रुग्णालयात दाखल केले. ताप जास्त असल्याने डॉक्टरांनी बाल अतिदक्षता विभागात नेण्याची सूचना केली. ३ नोव्हेंबरला सकाळी परिचारिकेने इंजेक्शन आणि औषधे आणण्याची चिठ्ठी दिली. मार्कंडेय औषधी भांडारमधून ती आणून देण्यात आली. सकाळी सलाइनद्वारे औषध देण्यात आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा १०० मिलिलिटर देण्यासाठी परिचारिका आल्या. त्या वेळी सलाइनच्या बाटलीत कीटक आणि पांढऱ्या रंगाची जाळी आढळून आली.

First Published on: November 7, 2018 8:07 PM
Exit mobile version