राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांबाबत मांडलेला आकडा चुकीचा, यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण

राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांबाबत मांडलेला आकडा चुकीचा, यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण

राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांच्या आकडेवारीवर राज्य सरकारला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी  घरचा आहेर दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांबाबत मांडलेला आकडा चुकीचा आहे, असा खुलासा करण्याची वेळ यशोमती ठाकूर यांच्यावर विधान परिषदेत आली. त्यांनी विधान परिषदेत वास्तविक आकडेवारी वाचून दाखवली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पातील भाषणात ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती.

सोलापूर जिल्ह्यात एकही महिला नाही, अशी बाब त्यांनी सभागृहात सांगितली होती. तसेच राज्य सरकारने मांडलेल्या आकडेवारीवर त्यांनी सवाल उपस्थित केला होता. पण ही आकडेवारी खरी नाही, असे स्पष्टीकरण यशोमती ठाकूर यांनी दिले. सोलापूर येथे २०१४ एकल महिला आहेत. त्यामध्ये अनेक महिला कोरोना काळात विधवा झाल्याची माहिती त्यांनी दिली. विधवा महिलांसाठी २५ योजना सुरू आहेत. तसेच वात्सल्य योजना केंद्राच्या माध्यमातूनही या महिलांना मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


 

First Published on: March 16, 2022 5:36 PM
Exit mobile version