घरमहाराष्ट्रमुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज...

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

माता रमाबाई आंबेडकर (MRA) मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात प्रवीण दरेकर मजूर नसतानाही त्यांनी तसे दाखवलं आणि निवडणूक लढवल्याचा उल्लेख आहे. या गुन्ह्याचा तपास माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबईः मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिलाय. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळली. प्रवीण दरेकरांना हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे भाजप नेते प्रवीण दरेकर अटकपूर्व जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयात जाणार असल्याचीही माहिती मिळालीय.

माता रमाबाई आंबेडकर (MRA) मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात प्रवीण दरेकर मजूर नसतानाही त्यांनी तसे दाखवलं आणि निवडणूक लढवल्याचा उल्लेख आहे. या गुन्ह्याचा तपास माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडून सुरू आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रवीण दरेकरांना धाव घेतली होती. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. तसेच त्यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबै बँकेतील मजूर घोटाळाप्रकरणी दरेकरांवर गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळतोय. मुंबईतल्या फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. दरम्यान षडयंत्र रचून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकरांना केलाय. याला कायद्याने उत्तर देऊ, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये मुंबई बँकेची शाखा आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसताना मजूर म्हणून भासवले आणि निवडणूक लढवली याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -