शेतकरी पुत्राची कंपनी फोर्ब्सच्या यादीत, शेतमालाची आधुनिक विक्री

शेतकरी पुत्राची कंपनी फोर्ब्सच्या यादीत, शेतमालाची आधुनिक विक्री

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील एका शेतकरी पुत्राच्या कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे. शेतकरी पुत्राच्या कंपनीचं नाव ग्रामहित असं आहे. यंदाच्या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये या शेतकरी पुत्राच्या कंपनीचं नाव यादीत आलं आहे.

ग्रामहित असं या कंपनीचं नाव असून त्याचे संचालक पंकज महल्ले आहेत. ही कंपनी शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते. परंतु तरीदेखील शेतमालाच्या आधुनिक विक्रीनुसार फोर्ब्स अशा उत्तम कंपन्यांची निवड करतात आणि जगासमोर मांडतात. त्यामुळे उद्योजकांना एक प्रोत्साहन मिळते.

पंकज महल्ले, श्वेता ठाकरे हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे असून शेतकऱ्यांना शेतमाल आणि विक्री करण्याची शास्त्रोक्त तसेच आधुनिक पद्धत उपलब्ध करुन देतात. शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देणेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.

शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलच्या एका क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते.

पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केले आहे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईमधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तर श्वेता यांनी अभियांत्रिकी पदवीनंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली.


हेही वाचा : अशोक चव्हाणांचे वृत्त दिशाभूल करणारे, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य


 

First Published on: September 2, 2022 8:41 PM
Exit mobile version