भारत जोडो यात्रा : शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर.., युवा काँग्रेसचा इशारा

भारत जोडो यात्रा : शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर.., युवा काँग्रेसचा इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. अनेक युवकांचा या यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या यात्रेला हजेरी लावली होती. परंतु राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा अनेकांकडून विरोध केला जात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपा, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. राज्यातील काही ठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. मनसेने शेगाव येथील सभेत निषेध करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मनसेनंतर आता युवक काँग्रेसनेही मनसेला प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले की, ज्या प्रकारे मनसेने आमच्या सभेत येण्याचं आव्हान दिलंय. त्याप्रमाणे आमचेही कार्यकर्ते ताकदीने उपस्थित राहणार आहेत. शेगाव येथे राहुल गांधींची खूप मोठी सभा होईल. जे अंदमान-निकोबारमध्ये युद्ध घडलं तिथे मराठा सैनिक मोठ्या प्रमाणात वीर झाले. त्यांच्याऐवजी माफीवीरांची आठवण त्यांना येते, त्याचा आम्ही निषेध करतो, असं कुणाल राऊत म्हणाले.

आमचे जवळपास ३० हजार युवक काँग्रेस सभेच्या ठिकाणी असणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त लोकंही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराही कुणाल राऊत यांनी मनसेला दिला आहे.

भारत जोडो यात्रा थांबवण्याची शिंदे गटाची मागणी

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कर्नाटकच्या तुमकूरमध्ये राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी काल वाशिम येथे पुन्हा सावरकरांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे असे दाखवून देऊया. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले आहे.


हेही वाचा : राष्ट्रगीताऐवजी दुसरेच गाणे वाजले; राहुल गांधींच्या सभेतील व्हिडीओ


 

First Published on: November 17, 2022 7:35 PM
Exit mobile version