Beauty : उन्हाळयात वापरा ‘हे’ 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

Beauty : उन्हाळयात वापरा ‘हे’ 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

उन्हाळयात चेहऱ्याची स्किन खूप डल आणि काळी होते. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मोसमी फळांचं वापर करा. जेणेकरून त्वचा छान राहील आणि त्वचेला एक ग्लो येईल ज्यामुळे त्वचा खराब होणार नाही. त्वचा निरोगी आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीने फेस मास्क तुम्ही ट्राय करू शकतात. हवामान बदलले की चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात. कधी मुरुमांची समस्या, कधी चिकटपणा. अशा सर्व समस्या टाळण्यासाठी आणि त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी उन्हाळ्यात या हंगामी फळांपासून फेस मास्क तयार करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते.

उन्हाळ्यात त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी, अशा प्रकारे लावा हे फेस पॅक

1. एवोकॅडो आणि मध-

चेहरा सुंदर ठेवण्यासाठी अॅव्होकॅडो हा एक उत्तम फळ आहे. या सुपरफूडमध्ये फळामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील भरपूर असते. जीवनसत्त्वे ए, डी आणि ई या फळामध्ये आढळतात, जे त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. एवोकॅडो आणि मधाचा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्याने चेहरा छान सुरक्षित राहतो. याशिवाय आपल्या त्वचेवरील डागही निघू लागतात.

असा लावा हा फेस मास्क-

2. पपई, कॉफी आणि लिंबाचा रस-

अँटिऑक्सिडेंट्सने युक्त पपई चेहऱ्याला ग्लो आणतो. व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असल्याने चेहऱ्याची त्वचा मऊ होते. यामध्ये असलेले पॅपेन एंझाइम चेहऱ्यावरील अकाली रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. दुसरीकडे, लिंबाच्या रसामध्ये असलेले तत्व उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या दूर करते. पपई, कॉफी आणि लिंबू फेस मास्क त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी काम करू शकतात.

असा लावा हा फेस पॅक-

3. आंबा आणि दही मास्क-

लॅक्टिक अॅसिडने भरपूर दही आपली त्वचा मऊ ठेवते. यातील एन्झाइम्स त्वचेला नरम ठेवतात. यामुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या टाळता येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी त्वचेसाठी लोशनचे काम करते. त्याचबरोबर आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला हायड्रेट ठेवतात.

असा लावा हा फेस मास्क-


हेही वाचा : उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी टॉमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

First Published on: May 31, 2023 11:20 AM
Exit mobile version