थंडीमुळे गळताहेत केस, तर करा हे उपाय

थंडीमुळे गळताहेत केस, तर करा हे उपाय
हिवाळा आला की अनेक समस्या घेऊनच येतो. जसे त्वचेचा कोरडेपणा, खाज सुटणे, त्वचा पांढरी होणे. याशिवाय शरीरात ओलावा नसल्यामुळे केस गळणे, कोंडा होणे आदी समस्याही प्रकर्षाने जाणवू लागतात, मात्र तुम्हाला थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणे फायद्यचे ठरू शकते.
अंघोळीच्या पाण्यात टाका मीठ-
जर तुम्ही दररोज कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास तुमची त्वचा स्वच्छ तर होईलच पण त्वचा आणि केस देखील चमकतील.

खाजेपासून सुटका –
थंडीत अनेक वेळा ओलसर कपड्यांमुळे अंगावर पुरळ उठणे, खाज येणे यांसारख्या समस्या डोके वर काढू लागतात. मीठामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने कोमट पाण्यात मीठ मिसळल्याने त्वचेवर असलेले बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होऊन रोगांपासून बचाव होतो, त्यामुळे त्वचेला समस्यांपासून संरक्षण मिळते.
चमक मिळेल-
हिवाळ्यात त्वचेची चमक कमी होऊ लागते. खास करून तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना अधिक प्रमाणात समस्या जाणवू लागतात. त्यामुळे
या दिवसात कोमट पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्याने त्वचेवरील डेड सेल्स निघून जातात. ज्याने त्वचा उजळते.
तणाव होईल कमी –
मीठ टाकेलले कोमट पाणी स्ट्रेस कमी करण्यास उपयुक्त आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि तुमचा थकवा दूर होतो.

 


हेही वाचा; ग्लिसरीन कसे वापरायचे?

First Published on: December 28, 2023 1:04 PM
Exit mobile version