महिलांच्या ‘या’ आजारपणामुळे गळतात केस

महिलांच्या ‘या’ आजारपणामुळे गळतात केस

बहुतांश महिला अशी तक्रार करतात की, त्यांचे केस फार गळतात. केस गळतीमुळे महिला फार त्रस्त असतात. त्याचसोबत केस गळती थांबावी म्हणून काही ना काही करत राहतात. परंचु या प्रोडक्ट्सचा किती ही वापर केला तरीही केस गळती थांबत नाही. पण केस गळतीमागे काही कारणं असू शकतात. याची कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यावर उपचार केल्यास तर ही समस्या दूर होऊ शकते. महिलांच्या शरिरात होणाऱ्या काही बदलावामुळे सुद्धा केस गळतीची समस्या उद्भवते.

थायरॉइडमुळे केस गळतात
भारतात जवळजवळ ४० टक्क्यांहून अधिक महिला थायरॉइडने ग्रस्त असतात. हा असा एक आजार आहे. ज्यामुळे आपल्या शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. अशातच खुप केस गळतात. थायरॉइड दोन प्रकारचे असतात. यावर वेळीच उपचार केला पाहिजे. याकडे दुर्लक्ष केल्यास तर गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते.

एनिमिया
महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत लोहाची कमतरता अधिक पाहिली जाते. शरिरात लोहाच्या कमतरतेमुळे केवळ थकवाच नव्हे तर केस ही फार गळतता. अशातच शरिरात हिमग्लोबिनची पूर्तता करणे फार गरजेचे असते. यामुळे तुम्ही लोहयुक्त आहाराचे सेवन करावे. जेणेकरुन एनिमियाची समस्या दूर होऊ शकते.

तणाव आणि डिप्रेशन
घर आणि घराबाहेर कामकाज करणाऱ्या महिला बहुतांशवेळा स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या शिकार होतात. वाढत्या मानसिक समस्यांमुळे महिलांचे केस खुप गळतात. अशा स्थितीत तुम्ही तणाव आणि डिप्रेशन पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. धावपळीच्या आयुष्यातून तुम्ही स्वत:साठी वेळ जरुर काढा.


हेही वाचा- Skin care : उन्हामुळे चेहरा काळा झाला का ? ‘या’ टिप्स करा फॉलो

First Published on: May 11, 2023 5:14 PM
Exit mobile version