Friday, May 17, 2024
घरमानिनीFashionFashion : साडीत स्लिम फिट दिसायचं ? ही स्टाईल नक्की ट्राय करा...

Fashion : साडीत स्लिम फिट दिसायचं ? ही स्टाईल नक्की ट्राय करा…

Subscribe

प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते. काही लोकांना हेवी वर्क साड्या स्टाईल करायला आवडतात तर काहींना साध्या सिम्पल साड्या घालायला आवडतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण साडी खरेदी करण्यासाठी बाजारात जातो तेव्हा आपण सर्वातआधी साडीची डिझाइन आणि नंतर त्याचे फॅब्रिक पाहतो. कारण साडीतल्या या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यामुळेच आपल्याला एक चांगला लूक मिळू शकतो. तसेच जेवढी तुमची साडी सुंदर तेवढं तुम्ही दिसणार सुंदर. अशातच जेव्हा स्लिम दिसण्याचा विचार येतो, तेव्हा नेहमी लाईट साड्या खरेदी करायला महिलांना आवडतात. यासोबतच हल्ली कोणता ट्रेंड साडीमध्ये चालू आहे हे आपण पाहणार आहोत.

Beautiful and stylish party wear saree designs|Latest designer saree collection. - YouTube

- Advertisement -

1. स्ट्रिप्स पार्टी वेअर साडी

स्लिम दिसण्यासाठी तुम्ही स्ट्रिप्स असलेली पार्टी वेअर साडी नेसू शकता. यासाठी तुम्हाला संपूर्ण साडीमध्ये स्ट्रिप्स असलेला पॅटर्न निवडावा लागेल. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉर्डर असलेली ही साडी देखील खरेदी करू शकता. नाहीतर साधी प्रिंटेड साडी सुद्धा घालू शकता. या साडीवर हेवी ब्लाउज घाला. याने तुम्ही खूप सुंदर दिसाल आणि स्लिम लूक मिळेल.

2. ऑर्गेन्झा प्रिंटेड साडी

तुम्हाला प्रिंटेड काहीतरी घालायचे असेल तर त्यासाठी तुम्ही ऑर्गेन्झा साडी नेसू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील. पण जर का तुम्हाला स्लिम दिसायचे असेल तर बारीक बॉर्डर असलेली साडी निवडावी लागेल ज्यामुळे तुमचा लूक चेन्ज होईल. ज्या ठिकाणी साडीची बॉर्डर असेल त्याठिकाणी हेवी डिझाइन्स असतील तरी त्यामुळे एक भारी लूक मिळू शकतो. अशा प्रकारची साडी तुम्ही परिधान करू शकता. यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. अशा प्रकारची साडी तुम्ही पार्टीमध्ये किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये सुद्धा घालू शकता.

- Advertisement -

3. नेट साडी

स्लिम लुकसाठी तुम्ही नेट साडी नेसू शकता. नेट साडीमध्ये तुम्हाला हेवी आणि सिम्पल अशी बॉर्डर मिळेल. तसेच ही साडी संपूर्ण प्लॅन असेल तसेच साडीमध्ये ब्लाउज पीस देखील उपलब्ध असेल. पण हे ब्लॉउज तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवू शकतात. विशेष म्हणजे या प्रकारची साडी नेसल्यावर चांगली दिसते आणि तुम्हाला परफेक्ट एक स्लिम लूक मिळून जातो. ज्यामुळे तुम्ही स्लिम फिट नककीच दिसू शकतात.


हेही वाचा : Fashion : शॉर्ट कुर्ती अशाप्रकारे स्टाईल करा

- Advertisment -

Manini