Wednesday, May 8, 2024
घरमानिनीFashionबनारसी साडीसोबत 'हे' ज्वेलरी सेट ठरतील परफेक्ट

बनारसी साडीसोबत ‘हे’ ज्वेलरी सेट ठरतील परफेक्ट

Subscribe

लग्न असो वा कोणता समारंभ महिलावर्ग आवर्जून बनारसी साडीची निवड करतात. बऱ्याच महिलांना किंवा मुलींना त्यावर पारंपरिक ज्वेलरी घालायला आवडते. पण, पारंपरिक ज्वेलरी सोबत तुम्ही ट्रेंडिंगवर असलेले काही ज्वेलरी सेट बनारसी साडीसोबत ट्राय करू शकता. ज्याने तुम्हाला रॉयल लूक मिळण्यास मदत होईल.

मण्यांचा नेकलेस सेट –
बनारसी साडीसोबत बीड्स नेकलेस सेट अर्थात मण्यांचा नेकलेस सेट खूप छान दिसतो. बनारसी साडी सोबत तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. या ज्वेलरीची खासियत म्हणजे यात तुम्हाला एक नाही तर अनेक लेयर्सचा नेकपीस मिळेल. ज्यामुळे हा सेट अधिक रॉयल दिसतो. विशेष म्हणजे अनेक रंगामध्ये हे ज्वेलरी सेट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

- Advertisement -

How much do Polki and Kundan sets cost? - FNP Venues

टेंपल ज्वेलरी सेट
जर तुम्हाला बनारसी साडीसोबत गोल्डन टच द्यायचा असेल तर टेंपल ज्वेलरी सेट हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळया डिझाइन्स मार्केटमध्ये मिळतील. गोल्डन आणि गडद रंगाच्या साडीसोबत हा सेट खूप छान दिसेल. शिवाय ह्यात मोत्याचा टच देणारी अनेक डिझाइन्स आता बाजारात येऊ लागले आहेत. बनारसी साडीसोबाबत पारंपरिक लूक साठी ही ज्वेलरी परफेक्ट दिसते.

- Advertisement -

कुंदन सेट –
जर तुम्हाला नवनवीन फॅशन ट्राय करायला आवडत असेल तर बनारसी साडीसोबत कुंदन नेकलेस सेट ट्राय करू शकता. यात सुद्धा एक ते दोन लेयर्सच्या डिझाइन्स तुम्हाला मिळतील. जर तुमच्या ब्लाउजची नेक लाईन डीप असेल तर त्यासोबत तुम्ही कुंदन सेट ट्राय करू शकता. याची खासियत सांगायची झाल्यास हे कुंदन सेट कोणत्याही रंगाच्या साडीवर मॅच होतात.

 

 


हेही वाचा ; एथनिक लूकसाठी परफेक्ट झुमके

 

- Advertisment -

Manini