पहिल्यांदाच साडी नेसणार आहात? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

पहिल्यांदाच साडी नेसणार आहात? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

कोणत्याही विशेष प्रसंगी बहुतेक महिला साडी नेसणे पसंत करतात. साडी नेसणे वाटते तितके सोप्पे नसते. विशेषतः जेव्हा आपण पहिल्यांदा साडी नेसतो. पण जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही क्षणार्धात परफेक्ट, गॉर्जिअस आणि क्लासी लूक कॅरी करू शकता. आज आम्ही पहिल्यांदाच साडी नेसणाऱ्या मुलींसाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही फॉलो केल्यास साडीत तुम्ही परफेक्ट दिसाल.

वजनाने हलकी साडी निवडा –
अनेक जणी पहिल्यांदा साडी नेसताना खास करून कांजीवरम, पैठणी अशा साड्यांची निवड करतात. या साड्या बऱ्यापैकी वजनाने जड असतात. ज्या नेसल्यानंतर तुम्हाला साडीत अस्वथ्य वाटू शकते. त्यामुळे पहिल्यांदा साडी नेसणाऱ्या मुलींनी वजनाने हलकी असणाऱ्या साडीची निवड करावी. यात तुम्हाला शिफॉन किंवा कॉटन हे उत्तम पर्याय आहेत.

प्लेट्स बनवताना काळजी घ्या –
पहिल्यांदाच साडी नेसताना प्लेट्स बनवताना तुम्हाला अडचणीचे ठरू शकते. अशावेळी तुम्ही साडीच्या प्लेट्स या आधीच तयार करून पिनअप करून ठेऊ शकता. असे केल्याने साडी नेसायला सोप्पे जाईल. याशिवाय हल्ली बाजारात रेडिमेड साड्या आल्या आहेत ज्याच्या प्लेट्स तयार असतात त्यासुद्धा तुम्ही नेसू शकता.

साडी योग्यरीत्या पिनअप करा –
अनेक जणी साडी नेसताना खूप जास्त प्रमाणात पिनांचा वापर करतात. मात्र, असे केल्याने साडी हाताळणे कठीण होते. त्यामुळे साडी नेसताना योग्यरीत्या पिनअप करणे महत्वाचे आहे. पहिल्यादांच साडी नेसत असाल तर यासाठी तुम्ही पदर, प्लेट्स यांना हवे असल्यास एकाहून अधिक पिन लावू शकता.

योग्य पेटीकोटची निवड –
साडीच्या आत पेटीकोट वापरत असल्याने अनेक जणी पेटीकोटच्या निवडीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, पेटीकोटची निवड करताना त्याची साईझ, साडीचा रंग यासर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आकाराचा पेटीकोट घातल्याने एकतर ते घट्ट तरी होते किंवा सैल तरी होते. अशाने साडी नेसल्यावर कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामळे पेटीकोटची निवड करताना उत्तमरीत्या फिटिंग असणारे पेटीकोटच निवडा.

ब्लाउजची निवड –
पहिल्यांदाच साडी नेसताना तुम्ही सोप्पी पद्धत फॉलो करणे अगदी उत्तम. अशावेळी ब्लाउज तुम्हाला साडीसोबत हटके लूक देऊ शकतो. साडीवर तुम्ही युनिक डिझाइनचे ब्लाउज ट्राय करू शकता. यात जर तुम्ही कॉलेज गर्ल असाल तर स्पगेटी, क्रॉप टॉप सुद्धा तुम्ही साडीसोबत घालू शकता.

 

 


हेही वाचा : ‘साडी जुनी, आयडिया नवी’, करा साड्यांचा भन्नाट वापर

First Published on: February 20, 2024 5:06 PM
Exit mobile version