Sunday, April 21, 2024
घरमानिनीFashion'साडी जुनी, आयडिया नवी', करा साड्यांचा भन्नाट वापर

‘साडी जुनी, आयडिया नवी’, करा साड्यांचा भन्नाट वापर

Subscribe

सणाच्यावेळी प्रत्येकाला सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते, विशेषत: जेव्हा महिलां अशी इच्छा असते. सणासुदीला बहुतेक महिलांना साडी नेसणे आवडते. साडी तुमच्या सौंदर्यात भर घालते. प्रत्येक भारतीय स्त्रीच्या कपाटात तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या आढळतील. यापैकी काही साड्या साध्या आणि दैनंदिन वापरासाठी असतात, परंतु काही साड्या बर्‍याच भारी आणि महागड्या असतात ज्या विशेष प्रसंगी वापरल्या जातात. पण काही साड्या अशा असतात ज्या कोणत्या ना कोणत्या कारणाने कधीही नेसल्या जात नाहीत. कारण एकतर तुम्हाला त्यांची प्रिंट किंवा रंग आवडत नाही. अनेक वेळा महिला अशा साड्या वर्षानुवर्षे कपाटात पडून राहतात किंवा कोणालातरी दिल्या जातात. तुमच्या कपाटात अशा साड्या असतील ज्या कित्येक दिवसांपासून पडून आहेत तर तुम्ही या सणासुदीच्या काळात काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्टाईल करून पुन्हा वापरू शकता.

एथनिक सूट
आज तुम्ही जुन्या साडीतून स्वत:साठी स्ट्रेट, ए-लाइन किंवा अनारकली सूट बनवू शकता. बनारसी, कांचीपुरम किंवा सिल्कच्या साड्या ठेवल्या असतील तर त्यापासून बनवलेला सूट खूपच सुंदर दिसतो.

- Advertisement -

साड्यांचा बनवा लेहंगा
बहुतांश घरामध्ये एखादी हेवी वर्क असणारी बनारसी साडी किंवा बनारसी शालू असतोच. बनारसी साडी नसली तरी तिच्या तोडीची दुसरी साडीही चालू शकेल फक्त तिचे काठ मोठे हवे. तर तुम्ही अशा मोठ्या काठ असणाऱ्या साड्यांपासून एक मस्त स्कर्ट बनवू शकता. मस्त घेरदार आणि पायापर्यंत लांब असा स्कर्ट बनवून घ्या आणि पदराचा वापर करून जरा वेगळ्या पद्धतीने ब्लाऊजही शिवून घ्या. या स्कर्ट, ब्लाऊजला शोभेल अशी ओढणी घेतली की छान लेहेंगा तयार होईल

लांब जॅकेट
ज्या साड्या खूपच जास्त भरजरी असतात आणि ज्यांचं टेक्स्चर जरा जाडसर असतं, अशा साड्यांचा उपयोग जॅकेट तयार करण्यासाठी करा. या जॅकेटला अस्तर लावा. स्टॅण्डकॉलर ठेवा आणि मस्तपैकी समोरून ओपनिंग असणारं गुडघ्यापर्यंत लांब भरजरी जॅकेट करा. जॅकेटच्या बाह्या तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे कमी-जास्त असू द्या. या जॅकेटच्या आत त्याला सुट होणारा कोणताही प्लेन रंगाचा स्लिव्हलेस कुर्ता घाला. कुर्त्याऐवजी तुम्ही एखादा पायघोळ वनपीस आणि त्यावर हे जॅकेट असा लूकही करू शकता. हा ड्रेस तर एखाद्या लग्नसमारंभातही हमखास भाव खाऊन जाईल

- Advertisement -

डौलदार वनपीस शिवा
जुन्या साडीचा हा सगळ्यात भारी आणि सोपा उपाय आहे. जुन्या साडीपासून तुम्ही मस्त, आकर्षक वनपीस तयार करू शकता. साडीच्या पदराचा वापर वरच्या भागासाठी करा आणि बाकीच्या साडीचा खाली भरपूर मोठा घेर बनवा. यावर ओढणी नाही घेतली चालेल.

फ्लेअर्ड स्कर्ट 
जर तुमच्याजवळ ब्रोकेट किंवा चंदेरी सिल्कची साडी पडून असेल तर तुम्हाला कोणालाही द्यायची नसेल तुम्ही त्याचा फ्लेअर्ड स्कर्ट बनवू शकता. परफेक्ट इंडो वेस्टर्न लूकसाठी तुम्ही प्लेन टॉप किंवा फॉर्मल शर्टसह परिधान करू शकता.

ट्युनिक किंवा टॉप
६ मीटर लांब साडीपासून तुम्ही सहज आपला टयुनिक किंवा टॉप सहज तयार करू शकता. जर तुमच्याकडे बांधणी, ब्लॉक प्रिंट किंवा बाटीक साडी असे तर त्याचा सुंदर टॉप किंवा शॉर्ट किर्ती बनवू शकता आणि जीन्स किंवा पँटवर परिधान करू शकता.

- Advertisment -

Manini