Saturday, May 18, 2024
घरमानिनीHealthलाल सिमला मिरचीचे सेवन केल्यास होतात 'हे' फायदे

लाल सिमला मिरचीचे सेवन केल्यास होतात ‘हे’ फायदे

Subscribe

भारतीय खाद्यपदार्थ असो, चायनीज किंवा इटालियन असो… यातल्या बहुतांश खाद्यपदार्थांत एक गोष्ट समान असते ती, म्हणजे सिमला मिरची. बाजारात लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची पाहायला मिळते, ज्याला परदेशी भाजी असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, की या सर्वांमध्ये लाल सिमला मिरची खाणे सर्वात फायदेशीर आहे. आहारात लाल सिमला मिरचीचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात –

1) लाल सिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनॉइड असतात, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे रेटिनाचे संरक्षण करतात आणि मॅक्युलर डिजनरेशनसारख्या समस्या टाळायला मदत करतात.

2) पेपरिका अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे, जो शरीराला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचण्यास मदत करतो.

Colour Capsicum by Sai Sai Traders, colour capsicum from Anantapur Andhra Pradesh | ID - 1417673

3)लाल सिमला मिरचीमध्ये ‘ए’ आणि ‘सी’ या व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणावर असतात. आपण लाल सिमला मिरचीचे सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते

4) पेपरिका हे खरे सुपर फूड आहे, कारण त्यात एपिजेनिन, ल्युपिओल, ल्युटोलिन, क्वेर्सेटिन आणि कॅपसिएट, बीटा कॅरोटीन, बीटा क्रिप्टोक्सॅन्थिन आणि लाइकोपीन यासारख्या कॅरोटीनोइड्ससह कॅन्सरशी लढा देणारे असंख्य अँटिऑक्सिडंट असतात.

5) लाल सिमला मिरचीमध्ये लाइकोपीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्सचे नुकसान रोखून हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


हेही वाचा ; थंडीत सीताफळ खाण्याचे आहेत अनेक फायदे

 

- Advertisment -

Manini