Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthअंतर्वस्त्राची स्वच्छता आणि संसर्ग

अंतर्वस्त्राची स्वच्छता आणि संसर्ग

Subscribe

शारिरीक स्वच्छता म्हणजे स्वच्छ शरीर आणि स्वच्छ वस्त्र. पण या वस्त्रांमध्ये अंतर्वस्त्रांचाही समावेश असतो याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसतं. यामुळे अंतर्वस्त्रांच्या स्वच्छतेला गांभीर्याने घेतले जात नाही.पण खरं तर शरिरातील अंतर्भागाला सुरक्षित ठेवणारे हे वस्त्रही शारिरीक स्वच्छतेसाठी महत्वाचे आहे.यामुळे इतर कपड्यांबरोबरच अंतर्वस्त्र स्वच्छ ठेवावे अन्यथा संसर्ग होण्याचा धोका असतो.

म्हणूनच अंडरवेअर कधीही व इतर वस्त्रांबरोबर धुऊ नये. जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये इतर कपड्यांसोबत अंडरवेअरही धुवायला टाकत असाल तर तसे करणे थांबवा. कारण त्यामुळे योनीमार्गाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

- Advertisement -

कारण जर तु्म्हाला किंवा घरातील व्यक्तीला काही इजा झाली असेल किंवा त्वचेचा आजार असेल, संसर्ग झाला असेल तर ते विषाणू कपड्यांच्या माध्यमातून शऱीरात प्रवेश करतात.

तसेच जर अंडरवेअर पूर्णपणे सुकलेली नसेल तर त्यात विषाणू असण्याची शक्यता वाढते. जर अशी अंडरवेअर तुम्ही वापरली तर तुम्हांला योनीसंर्सग होऊ शकतो.यात खाज येणे, पुरळ येणे असे त्वचाविकार होतात.वेळीच उपचार न केल्यास हे विकार गंभीर होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

स्वच्छ, कोरडी आणि योग्य प्रकारची अंतर्वस्त्रे परिधान केल्याने संसर्ग टाळता येऊ शकतात.

अस्वच्छ अंडरवेअर तुमच्या योनीच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

यामुळे अंडरवेअर कोमट पाण्यात डिटंर्जेट टाकून धुवावी.

 

- Advertisment -

Manini