Ice Cream Recipe : कूल कूल कोकोनट मँगो आईस्क्रीम

Ice Cream Recipe : कूल कूल कोकोनट मँगो आईस्क्रीम

सध्या आंबाचा सिझन आहे. यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात आंबे उपलब्ध आहेत. आंबा हे वर्षातून एकदा मिळणार फळ असल्याने आंबा हा सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. तसेच या आंब्यापासून विविध प्रकारच्या रेसिपीही बनवता येतात. यात प्रामुख्याने आमरस बरोबर आंबा आईस्क्रीम लोकप्रिय आहे. पण आज आपण आंबा आणि नारळापासून आईस्क्रीम कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूया.

साहीत्य- दोन आंबे, पाव वाटी नारळाचे दूध, दोन चमचे मेपल सिरप, वेनिला, पाच सहा पुदीन्याची पानं.

कृती- सर्वप्रथम आंब्याच्या फोडी करुन घ्या. त्यात नारळाचे दूध आणि मेपल सिरप टाका. नंतर हे सर्व मिक्सरमध्ये थोड जाड ब्लेंड करून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये हे पेस्ट ओता आणि ५-६ तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवा. नंतर त्यावर पुदीन्याच्या पानाने सजवा.

First Published on: June 10, 2023 7:37 PM
Exit mobile version