Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeRecipe : ब्रेड बटाटा चीज बॉल्स

Recipe : ब्रेड बटाटा चीज बॉल्स

Subscribe

लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे चीज बॉल्स. आपण बरेचदा घरी जमणार नाही म्हणून ही डिश करत नाही. पण अगदी काही वेळातच होणारी ब्रेड बटाटा चीज बॉल्सच्या डिशची नेमकी रेसिपी कशी आहे हे आता आपण पाहुयात. तसेच मुलांसाठी आणि तुमच्यासाठी ही डिश नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया ब्रेड बटाटा चीज बॉल्सला लागणारे साहित्य आणि कृती काय आहे…

साहित्य

  • 500 ग्रॅम बटाटे
  • 3-4 टेबलस्पून ब्रेड क्रंब्स
  • कोथिंबीर
  • बारीक चिरलेली कांद्याची पात
  • 2 टेबलस्पून लिंबाचा रस
  • ½ टेबलस्पून लाल मिरची पावडर, किंवा चवीनुसार
  • 1 टीस्पून लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून जिरे पावडर
  • मीठ-चवीनुसार
  • 100-ग्राम चीज, ½ इंच चौकोनी तुकडे
  • ¼ टीस्पून लाल मिरचीचे फ्लेक्स

कोटिंग साहित्य

  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • ¼ टीस्पून लाल तिखट पावडर
  • चवीनुसार-मीठ
  • 1 टेबलस्पून पाणी
  • 1 कप ब्रेडचे तुकडे
  • तेल, तळण्यासाठी

Cheese Stuffed Mashed Potato Balls Recipe - The Cooking Foodie

कृती

  • सर्वप्रथम बटाटे धुवून घ्या आणि मीठ टाकून उकळवा. यानंतर याची साल काढून बटाटे चांगले मॅश करा.
  • मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मसाल्याचे सर्व साहित्य घाला आणि चांगले मिसळा.
  • यानंतर चीजचे चौकोनी तुकडे करा. आणि मग त्याला लाल मिरची, काळी मिरी लावून ठेवा.
  • आता बटाट्याचे छोटे छोटे गोळे करा आणि त्यात चीज क्यूब्स घाला.
  • चीज क्यूब पूर्णपणे बटाट्याने झाकलेले असल्याची खात्री करा.
  • आता मीठ, लाल तिखट कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून मिडियम पातळ मिश्रण तयार करा.
  • यानंतर प्रत्येक बटाटा चीझ बॉल ला ब्रेड क्रंबमध्ये डीप करून घ्या.
  • आता हे हाफ रेडी आणि झालेले चीझ बटाटा रोल्स फ्रीजमध्ये 30 मिन घट्ट होण्यासाठी ठेवा.
  • यानंतर गरम तेलात बटाटा चीज बॉल सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

हेही वाचा : Recipe : उरलेल्या भातापासून बनवा टेस्टी भजी

- Advertisment -

Manini