Sunday, May 19, 2024
घरमानिनीRecipevegetable kabab Recipe : वेजिटेबल कबाब

vegetable kabab Recipe : वेजिटेबल कबाब

Subscribe

घरात अचानक पाहुणे आले की, काय बनवायचे हे समजत नाही. अनेक गृहिणींचा अशावेळी गोंधळ उडतो. अशावेळी तुम्ही बनवायला सोपे असे वेजिटेबल कबाब बनवू शकता.

साहित्य :

बेसन – 3 टीस्पून
बटाटे – 4 उकडलेले
गाजर – 1
सिमला -1
कांदा – 1
आले – 1 बारीक तुकडा
हिरवी मिरची – 2
लाल मिरची पावडर – चवीनुसार
हळद – चिमूटभर
लिंबाचा रस – 1/2 टेबलस्पून
तेल – आवश्यतेनुसार
मीठ – चवीनुसार

- Advertisement -

कृती :

  • वेजिटेबल कबाब बनविण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसन घ्या. यात आता उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
  • बेसन आणि बटाटे चांगले एकजीव झाल्यावर यात बारीक कापलेले गाजर, सिमला मिरची, कांदा मिक्स करा.
  • सर्व भाज्या बेसनमध्ये एकजीव झाल्यावर यात बारीक कापलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस, किसलेले आले आणि सर्व मसाले, चवीनुसार मीठ मिक्स करा.
  • तुम्ही चवीसाठी यात कसुरी मेथी सुद्धा टाकू शकता.
  • आता तुमचे कबाब बनविण्याचे मिश्रण तयार झाले आहे.
  • तयार मिश्रण हातावर घेऊन त्याचे छोटे कबाब बनवा, दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.
  • नंतर सर्व कबाब गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
  • सर्व्ह करताना टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत तुम्ही वेजिटेबल कबाब खावू शकता.

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisement -

हेही वाचा : गव्हाची कुरकुरीत चकली 

- Advertisment -

Manini