घरक्राइमGadchiroli : गडचिरोलीत स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर आणि डिटोनेटर नष्ट; पोलिसांची...

Gadchiroli : गडचिरोलीत स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर आणि डिटोनेटर नष्ट; पोलिसांची मोठी कारवाई

Subscribe

गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड परिसरातील उंच पहाडीवर नक्षल्यांनी लपवून ठेवलेले 9 आयईडी बॉम्ब, 3 क्लेमोर व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोलीतील टिपागड परिसरात स्फोटके आणि मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी C60 ची एक तुकडी आणि CRPF ची एक QAT यांच्यासह 2 BDDS पथके तैनात करण्यात आली होती.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड परिसरातील उंच पहाडीवर नक्षल्यांनी लपवून ठेवलेले 9 आयईडी बॉम्ब, 3 क्लेमोर व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोलीतील टिपागड परिसरात स्फोटके आणि मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी C60 ची एक तुकडी आणि CRPF ची एक QAT यांच्यासह 2 BDDS पथके तैनात करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. (gadchiroli crpf found 6 pressure cookers filled with explosives and detonators in tipagad)

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांची शोध मोहीम राबवत असताना पोलिसांना रविवार 5 मे रोजी टिपागड परिसरात एक पिन पॉईंट स्थान उघडकीस आले होते. त्याठिकाणी डोंगरावर ही स्फोटके आणि त्यावर माती टाकण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब 02 BDDS संघांसह C60 ची एक तुकडी आणि CRPF ची एक QAT असलेली एक टीम डंपचा शोध घेण्यासाठी आणि गरज पडल्यास ती नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi Masala Racket : दूध, तांदळानंतर आता मसाल्यातही भेसळ; दिल्लीत 15 टन बनावट मसाला जप्त

त्यानुसार, आज, सोमवार 6 मे रोजी त्यांना स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर आणि डिटोनेटर सापडले आणि स्फोटकांनी भरलेले 3 क्लेमोर पाईप्स आणि श्रापनेल्स देखील सापडले. उर्वरित 3 क्लेमोअर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकूण 9 आयईडी आणि 3 क्लेमोर पाईप्स बीडीडीएस टीमने घटनास्थळी नष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले असून, टीम संघ क्रॉस कंट्रीमधून जवळच्या चौकीकडे परतण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Crime News : चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीला मुंबई विमानतळावर अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -