23 डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींचा असणार सुवर्णकाळ

सुख-संपदा, ऐश्वर्य आणि विलासितेचा कारक गुरु ग्रह 4 सप्टेंबरला मेष राशित वक्री झाला होता. त्यानंतर येणाऱ्या 118 दिवसांपर्यंत तो वक्रीच राहणार आहे. त्यानंतर मात्र 23 डिसेंबर 2023 पर्यंत मेष राशीत जाणार आहे. देवगुरु गुरू जवळजवळ चार महिने वक्री राहणार असल्याने त्याचा 12 राशींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे. वक्री गुरुच्या काळात काही राशींच्या व्यक्तींवर या ग्रहामुळे लाभ होऊ शकतो.

सिंह राशी
गुरू ग्रहाच्या कृपेमुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. या दरम्यान तुमच्या आयुष्यातील अडथळे ही दूर होतील. सिंह राशिच्या व्यक्तींना कामावर नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. खास गोष्ट अशी की, मेष राशीत गुरू वक्री झाल्याने परदेशी दौरा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिने योग्य निर्णय घेतला तर नक्कीच तो योग्य असेल. सिंह राशीच्या नवव्या घरात मेष राशित गुरु वक्री झाल्याने काही रोमांचक अनुभव येऊ शकतात.

धनु राशी
देवगुरु गुरूच्या पाचव्या घरात वक्री झाल्याने धनु राशीच्या तरुणांना आनंदाची बातमी मिळू शकते. पारिवारीक प्रकरणांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. परिवारातील एखाद्या नव्या सदस्याचे आगमन होऊ शकते. यादरम्यान तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. धनु राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक यश मिळू शकते. बचत करण्यास यश मिळेल. मेष राशीत वक्री गुरु तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल.

मकर राशी
मकर राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी वक्री गुरु कार्यांमध्ये यश देईल. तुमचा आत्मविश्वास वाढला जाईल आणि तुम्ही तुमची तुमच्या लक्ष्यांच्या दिशेने वाटचाल होईल. या व्यतिरिक्त जमीन, वाहन खरेदी करण्याचे ही संकेत मिळतील. मकर राशीतील व्यक्ती नवी संपत्ती खरेदी करू शकता.


हेही वाचा- शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

First Published on: September 21, 2023 1:20 PM
Exit mobile version