कठीण परिस्थितीवर मात करत विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघातील ‘तिची’ कथा

कठीण परिस्थितीवर मात करत विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघातील ‘तिची’ कथा

चंदा मांडवकर :

 

भारतीय महिला संघातील ‘तिची’ कथा (Optional)

महिला टी२० विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या पहिल्या आयसीसी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. यामुळे आता संघातील प्रत्येक महिला क्रिकेटपटूंचे सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे. देशाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहेच. पण प्रत्येक महिला क्रिकेटपटूचा या सामन्या पर्यंत पोहचण्याचा प्रवास मात्र सोप्पा नव्हता. आयुष्यात अनेक चढउतार पाहत तर कधी परिस्थितीवर मात करुन प्रत्येकजणी या संघात आपले स्थान मिळवण्यासाठी लढल्या आहेत. यामुळेच त्यांना आपल्या मेहनीचे फळ हे विश्वचषकाच्या रुपात अखेर मिळाले आहे असे म्हणावे लागेल. अशातच विश्वषक आपल्या नावावर करणाऱ्या संघातील ‘तिची’ कथा पाहूयात.

शेफाली वर्मा

शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून आला. शेफालीला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होतीच. पण वडिलांना ही क्रिकेट आवडायचे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायचे होते. पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण न झाल्याने त्यांनी शेफालीला घरीच ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. पण मुलगी असल्याकारणास्तव तिला कोणत्याही अॅकेडमीत प्रवेश दिला जात नव्हता. अखेरत तिला क्रिकेट अॅकेडमीत स्थान मिळाले.

अर्चना देवी

अर्चना देवी हिचे आयुष्य ही खडतर होते. कारण क्रिकेटमध्ये एक महिला खेळाडू म्हणून खेळणे यासाठी तिच्या आईला लोकांचे टोमणे ऐकावे लागलेच. त्याचसोबत बालपणीच वडिलांचे छत्रछायेपासून ती दूर राहिली आणि भावाला साप चावल्याने मृत्यू झाला होता. अशातच समाजाने आपले खरं रूप दाखवले. तिच्या आईवर जादू-टोण्याचे आरोप ही लावले गेले. मात्र आईने कधीच हार मानली नाही. तिने मुलीला कस्तूरबा गांधी शाळेत प्रवेश दिल्यानंतर तिचे भाग्यच बदलले गेले. अर्चना देवी मधील खेळाडू गुण पाहता तिला शिक्षिका आपल्या सोबत ट्रेनिंगसाठी घेऊन गेली. तेव्हा सुद्धा नातेवाईकांनी विरोध केला पण अखेर ऐकेकाळी क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी न देणारे नातेवाईकच आता तिच्यावर गर्व करतायत.

श्वेता सेहरावत 


श्वेता हिचे वडील नेहमीच तिला क्रिकेट खेलण्याबद्दलच्या गोष्टीत टाळाटाळ करायचे. वयाच्या ७ व्या वर्षीच तिच्या बहिणीने तिला क्रिकेट अॅकेडमीत प्रवेश मिळवून दिला. कोचने एकदा फलंदाजी करण्यास सांगितले असता तिची त्यावेळची उत्तम कामगिरी पाहता वडिलांनी दुसऱ्याच दिवशी क्रिकेटची किट तिला घेऊन दिली. येथून श्वेताच्या क्रिकेटचे करियर सुरु झाले होते.

ऋचा घोष

ऋचा हिचा जन्म पश्चिम बंगाल मधील. तिचे वडिल आपल्या तरुण्यात एका क्लबचे क्रिकेट खेळाडू होते. तेव्हापासून ऋचा त्यांच्यासोबत जायची. कमी वयातच ऋचा हिची क्रिकेट मधील आवड अधिकाधिक वाढू लागली होती.

गोंगडी त्रिषा

गोंगडी त्रिषा हिला क्रिकेटर बनवण्यामागे तिच्या वडिलांची फार मोठी भुमिका आहे. मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष ही करावा लागला. जिमची अर्ध्या किंमतीत विक्री आणि नोकरी सोडून गोंगडी त्रिषाच्या वडिलांनी तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यास खरंच खुप मेहनत केली.

सौम्या तिवारी

सौम्याने कपडे धुण्याच्या थापीने क्रिकेट खेळण्यास शिकली होती. तिला लेडी विराट कोहली बनायचे होते. विराट प्रमाणेच अंडर१९ विश्वकप संघाचा हिस्सा बनण्यासाठी ती मैदानात उतरली.

सोनिया मेंधिया

१८ वर्षीय सोनिया मेंधिया ही हरियाणातील आहे. ती वेगवान स्ट्राइक रेट फलंदाजी करण्यासाठी ओळखली जाते. तिने आयसीसी अंडर १० टी२० महिला विश्वचषकात ११ धावा काढल्या.

मन्नत कश्यप

मन्नत कश्यप पटियाला जेथे जन्मली असून तिने बालपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यावेळी ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची. तिचे या सामान्यतील प्रदर्शन ही उत्तम राहिले.

पाव चोपडा

डावखुरी लेग स्पिनर पार्वी चोपडा हिने सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्य. वडिलांच्या सांगण्यावरुन तिने स्केटिंगचे स्वप्न मागे सोडत क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला होता.

सोनम यादव

 

फिरोजाबाद मध्ये राहणारी सोनम यादव हिचे वडिल एक कामगार होते. तर भावाला क्रिकेटमध्ये खुप आवड होती. पण त्याचे करियर त्यामध्ये झाले नाही. सोनम यादव ही डावखुरी स्पिनर आहे.

सोपदांधी यशश्री

हर्ले गाला दुखापतग्रस्त असूनही यावेळी सोपदांधी यशश्रीचा संघात समावेश करण्यात आला. या विश्वचषकात सोपदांडीने स्कॉटलंडविरुद्ध एकच सामना खेळला होता. सोपदांधी ही उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज असून ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादचे प्रतिनिधत्व करतो.

फलक नाज

फलक नाज ही एक वेगवान गोलंदाज आहे. तिने वयाच्या १२ व्या वर्षीच भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. अत्यंत गरिबीतून वर आलेली फलक नाजने भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर तिचे फार कौतुक केले.

 


हेही वाचा :

सोलो ट्रिप प्लॅन केली असेल तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

First Published on: January 31, 2023 5:10 PM
Exit mobile version