मावळ्याने ‘कोस्टल रोड’साठी खोदला १०० मीटरचा बोगदा

मावळ्याने ‘कोस्टल रोड’साठी खोदला १०० मीटरचा बोगदा

मावळ्याने 'कोस्टल रोड’साठी खोदला १०० मीटरचा बोगदा

मुंबईतील पहिल्या कोस्टल रोडचे काम सध्या जमिनीखालील भागात सुरू आहे. तब्बल १२,७२१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या कोस्टल रोडचे २०% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या कोस्टल रोडअंतर्गत दोन महत्वाचे बोगदे खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ११ जानेवारीपासून बोगदे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १०० मीटरपेक्षाही जास्त खोदकाम करण्यात आले आहे. १८ महिन्यात दोन बोगदे खोदण्यात येणार आहेत. बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. १०० मीटरच्या बोगदा खोदकामा दरम्यान ‘मावळा’ यंत्राच्याच मदतीने तब्बल ४७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील ७ कंकणाकृती कडांचीही उभारणी मावळ्याच्या मदतीने करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिली आहे.

मावळ्याने ‘कोस्टल रोड’साठी खोदला १०० मीटरचा बोगदा

‘कोस्टल रोड’ हा प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकपर्यंत १०.५८ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १२,७२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १३०० कोटी रुपये खर्चून २० टक्के विकास कामे पूर्ण झालेली आहेत. पुढील २०२१ पर्यंत ५०% – ५५% तर २०२२ पर्यंत ८५% आणि जुलै २०२३ पर्यंत १००% पर्यंत काम पूर्ण होणार आहे. या ‘कोस्टल रोड’ या प्रकल्पात रस्ते, पूल, उन्नत रस्ते, बोगदे, पार्किंग व्यवस्था, गार्डन आदींचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प तीन पॅकेजमध्ये विभागला आहे. पॅकेज -१ प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंत (३.८२ किमी), पॅकेज -२ बडोदा पॅलेस ते वांद्रे – वरळी सी लिंकपर्यंत (२.७१ किमी) आणि पॅकेज -४ प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत (४.०५ किमी) असून पॅकेज -३ हे वांद्रे ते दहिसरपर्यंत असणार आहे. ते काम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

मावळ्याने ‘कोस्टल रोड’साठी खोदला १०० मीटरचा बोगदा
१८ महिन्यात दोन बोगदे खोदणार

कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज -४ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्येकी २.०७ किमी लांबीचे दोन बोगदे ‘मावळा’ संयंत्राद्वारे ( टनेल बोअरिंग मशीन) खोदण्यात येणार आहेत. एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा असणारा आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली व वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. ११ ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आप्तकाळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे. प्रत्येक बोगदा खोदण्यासाठी ९ महिने याप्रमाणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.


हेही वाचा- सोने झाले सामान्यांना परवडणारे, जाणून घ्या आजचे दर

 

First Published on: March 2, 2021 6:29 PM
Exit mobile version