चिंताजनक! मुंबईत आतापर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी

चिंताजनक! मुंबईत आतापर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी

देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच कोरोनाने बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील वाढत आहे. आता कोरोनाचा विळखा पोलीस दलाला देखील बसत असून मुंबईतल्या एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाकोला पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते त्यांच्यावर वांद्रे येथील जम्बो कोविड सेंटरवर उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत मुंबईत १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना वांद्रे येथी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांची अचानक प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाचा धोका वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत १०१ मुंबई पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जलदगतीने होत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात २४ तासांत ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे. तर मागील २४ तासांत ३४,००८ रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.


हेही वाचा – कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पालिकेचा ‘Action Plan’


 

First Published on: April 12, 2021 2:03 PM
Exit mobile version