Corona Update: मुंबईत दिवसभरात १,०३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

Corona Update: मुंबईत दिवसभरात १,०३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

Mumbai Corona Update: no corona death in Mumbai today

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजार १२९वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार १२९ मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत ८१ हजार ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज झालेल्या मृतांमध्ये २३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २४ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २६ जण हे ६० वर्षांवरील, तर १२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८५९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांचा आकडा ७७ हजार ५९६ वर पोहोचला आहे. तसेच १ हजार ७०६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८१ हजार ९४४ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के एवढा आहे. मुंबईत २६ जुलै पर्यंत ४ लाख ८५ हजार ५६३ कोविड चाचण्या झाल्या आहेत. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा दुप्पटीचा दर ६८ दिवसांचा आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत आढळले ७,९२४ नवे रुग्ण, २२७ जण मृत्यूमुखी!


 

First Published on: July 27, 2020 8:41 PM
Exit mobile version