Mumbai Coronavirus Daily Update: आज कोरोनाचे १ हजार नवे रुग्ण, तर ४१ जणांचा मृत्यू

Mumbai Coronavirus Daily Update: आज कोरोनाचे १ हजार नवे रुग्ण, तर ४१ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार २६७ वर पोहचली आहे. तर ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ७५२ वर पोहचला आहे.

आज दिवसभरात मुंबईमध्ये ९६५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ७२ हजार ६५० रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज १ हजार ४३ नवे रुग्ण सापडले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २७ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २४ जण हे ६० वर्षांवरील, तर १४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८४१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७१ हजार ३५ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. तर २४ तासांत ९६५ कोरोना रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७२ हजार ६५० इतकी आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ७१% आहे. तर सध्या कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा २३ हजार ८६५ आहे.


हेही वाचा – कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; ४२७ नवे रुग्ण, तर २५५ मृत्यू


 

First Published on: July 20, 2020 8:58 PM
Exit mobile version