Corona Update: मुंबईकरांनो चिंता वाढली! पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या हजार पार!

Corona Update: मुंबईकरांनो चिंता वाढली! पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या हजार पार!

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत कधी घट तर कधी वाट होताना दिसत आहे. काल (शनिवारी) मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्या हजाराच्या आत होती. पण मुंबई नव्या रुग्णांची संख्या हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार ५१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २५ हजार ९१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४७० जणांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या ५ रुग्णापैकी काहींना दीर्घकालीन आजार होते. ४ रुग्ण पुरुष आणि १ रुग्ण महिला होती. ५ जणांचे वय ६० वर्षांच्या वर होते.

आज दिवसभरात मुंबईतील ८१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत ३ लाख ३ हजार ८६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर २४५ दिवसांवर पोहोचला आहे.

२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंतचा एकूण कोरोना वाढीचा दर ०.२८ टक्के इतका आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत ३२ लाख ७५ हजर २७० कोरोनाचा चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – उद्यापासून होणार ‘हे’ नवे नियम लागू; कोरोना लसीच्या पुढील टप्प्यात आणखी बरेच बदल


 

First Published on: February 28, 2021 8:55 PM
Exit mobile version