Corona Update: गेल्या २४ तासांत मुंबईत आढळले १,०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू!

Corona Update: गेल्या २४ तासांत मुंबईत आढळले १,०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू!

Mumbai corona virus Update: मुंबईत वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५,६३१ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५४ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ८९१वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ५ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १५८ रुग्ण बरे झाले असून एकूण ७८ हजार २६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज १ हजार ५१ संशयीत रुग्ण भरती झाले असून संशयीत भरती झालेल्या रुग्णांची संख्या ७४ हजार ९२४वर पोहोचली आहे.आज झालेल्या मृतांपैकी ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच ३७ रुग्ण पुरुष आणि १७ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ३९ जणांचे वय ६० वर्षा वर होत, तर उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच २३ जुलैपर्यंत ४ लाख ६२ हजार ७२१ कोविडच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६५ दिवसांचा आहे. धारावीत आज ६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५१९वर पोहोचली आहे. यापैकी २ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – कोरोनाचे इंजेक्शन ब्लॅकने विकणारी सेवानिवृत्त शिक्षिका गजाआड


 

First Published on: July 24, 2020 9:07 PM
Exit mobile version