Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचे १ हजार १९९ नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचे १ हजार १९९ नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू

Mumbai Corona virus Update 3,671 new covid-19 positive patients registered in mumbai today

मुंबईमध्ये १ हजार १९९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १७८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ६४७ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये शनिवारी १ हजार १९९ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४० जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४० पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४२ जण हे ६० वर्षांवरील, तर १९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ९४६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६९ हजार ३०८ वर पोहोचली आहे. तसेच १ हजार १५२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७० हजार ४९२ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यामध्ये गेल्या २४ तासांत ८ हजार ३४८ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १४४ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ९३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ३०६ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ६६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा –

Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३४८ नवे रूग्ण; १४४ जणांचा मृत्यू

First Published on: July 18, 2020 8:54 PM
Exit mobile version