घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात २४ तासांत ८,३४८ नवे रूग्ण; १४४ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३४८ नवे रूग्ण; १४४ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आतापर्यंत एकूण ३,००,९३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे

देशभरासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३४८ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १४४ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३,००,९३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ३०७ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ६६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,००,९३७ (१९.७६ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार ५५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज एकूण १ लाख २३ हजार ३७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११८६ १००३५० ६५ ५६५०
ठाणे २९० १०१५५ २०५
ठाणे मनपा ३३१ १६८९४ ६११
नवी मुंबई मनपा ३६५ १२६३१ ३४०
कल्याण डोंबवली मनपा ५१८ १७६४० २८३
उल्हासनगर मनपा १५३ ५६५७ ९२
भिवंडी निजामपूर मनपा ६० ३२७४ २१९
मीरा भाईंदर मनपा २२७ ७०३८ २२६
पालघर ५७ २२९३ २६
१० वसई विरार मनपा २१९ ९२७३ २०८
११ रायगड २५२ ५६९३ १०२
१२ पनवेल मनपा १३१ ५१४८ १०९
१३ नाशिक ९२ २१७४ ८८
१४ नाशिक मनपा २२८ ५५४४ १८४
१५ मालेगाव मनपा १२५० ८५
१६ अहमदनगर १७ ७०१ २५
१७ अहमदनगर मनपा ५१९
१८ धुळे २७ ९३७ ४५
१९ धुळे मनपा १६ ८७७ ३७
२० जळगाव १८२ ५३८५ ३०९
२१ जळगाव मनपा १८ १७८१ ७३
२२ नंदूरबार १० ३६० १६
२३ पुणे ३०७ ५१११ १३७
२४ पुणे मनपा १५८९ ३६८०८ १६ ९९४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६४२ ९६५६ १८३
२६ सोलापूर १५१ १५२२ ४९
२७ सोलापूर मनपा ८४ ३७९६ ३३३
२८ सातारा ८१ २२५४ ७५
२९ कोल्हापूर २२७ १६४९ २६
३० कोल्हापूर मनपा ३४ २१६
३१ सांगली २७ ६२१ १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३० २४९
३३ सिंधुदुर्ग २७१
३४ रत्नागिरी ३५ ११२५ ४०
३५ औरंगाबाद ४६ २३३२ ३९
३६ औरंगाबाद मनपा २१४ ७१२३ ३२५
३७ जालना ७० १२९८ ५४
३८ हिंगोली ३८७
३९ परभणी १६८
४० परभणी मनपा १४१
४१ लातूर २१ ६०७ ३४
४२ लातूर मनपा २२ ४०८ १४
४३ उस्मानाबाद १५ ४८१ २४
४४ बीड १६ ३२३
४५ नांदेड ३७ ३३६ १४
४६ नांदेड मनपा १७ ४४४ २०
४७ अकोला ४८ ४९९ २५
४८ अकोला मनपा १५१९ ७१
४९ अमरावती १३ १६० ११
५० अमरावती मनपा ४० ९६७ ३४
५१ यवतमाळ १६ ५०८ १६
५२ बुलढाणा ४८२ २२
५३ वाशिम १३ ३१४
५४ नागपूर ४४ ४८०
५५ नागपूर मनपा ३१ २००३ २१
५६ वर्धा १६ ६६
५७ भंडारा १७९
५८ गोंदिया २२५
५९ चंद्रपूर १० १६१
६० चंद्रपूर मनपा ५३
६१ गडचिरोली १७३
इतर राज्ये /देश २२ २४८ ३२
एकूण ८३४८ ३००९३७ १४४ ११५९६

 

- Advertisement -

आतापर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ६६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा ५५.०५ टक्के इतका झाला आहे. यासह राज्यात आज १४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८५% एवढा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -