Corona Update: मुंबईत २४ तासांत १,२८२ रुग्णांची वाढ, एकूण आकडा ८८ हजार पार!

Corona Update: मुंबईत २४ तासांत १,२८२ रुग्णांची वाढ, एकूण आकडा ८८ हजार पार!

Mumbai Corona Update: ब्रेकिंग! मुंबईत बुधवारी २,५१० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

मुंबईत २४ तासांत कोरोनाचे १ हजार २८२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या ४८ तासांत ६८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ७९५वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ५ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत मुंबईत ५१३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५९ हजार ७५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेड ६७ टक्के एवढा आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ४७ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

गेल्या ४८ तासांत झालेल्या मृत्यूंपैकी २७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर ३१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४३ जण हे ६० वर्षांवरील, तर २२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८२० संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांचा आकडा ६१ हजार ८३१वर पोहोचला आहे.

आज धारावीत ९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३४७वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये २३ आणि माहिममध्ये १७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ६७ तर माहिमधील १ हजार ३१६वर पोहोचला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू!


 

First Published on: July 9, 2020 9:24 PM
Exit mobile version