Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होत होती. २० हजारांहून अधिक दैनंदिन नवे कोरोनाबाधित आढळत होते. मात्र कालपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आजही मुंबईतील नव्या कोरोनाबाधित संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १३ हजार ६४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २७ हजार २१४ रुग्ण रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील आजच्या कोरोना आकडेवारीने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र आता रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे कुठेतरी दिलासा मिळताना दिसत आहे. आज आढळलेल्या १३ हजार ६४८ रुग्णांपैकी ११ हजार ३२८ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. ७९८ रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करावे लागले आहेत. आज दिवसभरात मुंबईत ५९ हजार २४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत १ कोटी ४२ लाख ६३ हजार ४७ चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख २८ हजार २२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ४११ जणांचा मृत्यू झाला असून ८ लाख ५ हजार ३३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १ लाख ३ हजार ८६२ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर ३७ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत १६८ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona: राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक पिरियड कधीपर्यंत आणि ओसरणार कधी? आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा


 

First Published on: January 10, 2022 8:44 PM
Exit mobile version