महाराष्ट्रातील १४ पक्षांच्या प्रजाती हाय रिस्कवर

महाराष्ट्रातील १४ पक्षांच्या प्रजाती हाय रिस्कवर

महाराष्ट्रातील दुर्मिळ पक्षांच्या प्रजाती

महाराष्ट्रातील जवळपास १४ पक्षांच्या प्रजाती या संवर्धनासाठी हाय रिस्कवर आहेत असे नुकत्याच एका अहवालातून समोर आले आहे. पश्चिम घाटातील दुर्मिळ अशा १२ प्रजातींमध्येही घट झाल्याचे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड २०२० या अहवालामध्ये नमुद केले आहे.

संपुर्ण देशातील ८६७ भारतीय पक्षांचा अभ्यास या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलेल आहे. त्यामध्ये १५ हजार ५०० इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षकांनी संपुर्ण देशातून ही माहिती गोळा केली आहे. सिटीझन सायन्स डेटाचा वापर करून ही माहिती जमा करण्यात आली आहे. संपुर्ण देशभरातील एकुण १०१ पक्षांच्या प्रजाती या हाय रिस्कवर आहेत असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

अहवालातील माहितीनुसार गेल्या अनेक वर्षाच्या ट्रेंडनुसार देशातील पक्षाच्या जवळपास ४८ टक्के प्रजाती या स्थिर असल्याचे आढळले आहे. तर गेल्या पाच वर्षात ७९ टक्के पक्षांच्या प्रजातीत घट पहायला मिळाली आहे. अहवालातील माहितीनुसार पश्चिम घाटातील जवळपास १२ प्रजाती या संवर्धनाच्या दृष्टीने हाय रिस्कवर आहेत. गेल्या २० वर्षातील आकडेवारीमुळे या प्रजाती हायरिस्कवर असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास ७५ टक्के या प्रजातींची उपलब्धतता कमी झाल्यानेच या प्रजाती हायरिस्कवर असल्याचे मानले जात आहे.

पश्चिम घाटात झालेले पर्यावरणीय बदलही या पक्षांच्या प्रजाती कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. पश्चिम घाटाच्या परिसरात मध्य आणि दक्षिण भागात गवताळ प्रदेशात झालेली घट हेदेखील एक मुख्य कारण मानले जात आहे. या गवताळ प्रदेशाची जागा आता चहाच्या लागवडीने घेतली आहे. त्यामुळे पक्षांच्या प्रजातींना राहण्यासाठी खूपच कमी अशी जागा उरल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

या आहेत दुर्मिळ प्रजाती
मलबार ग्रे हॉर्नबिल, मलबार हिल बार्बेट, मलबार हिल परकीत, मलबार वुडश्राईक, व्हाईट बेलिट ट्रेपी, निलगिरी फ्लॉव्हरपेकर, क्रिमसन बॅक सनबर्ड, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, व्हाईट बेलिड ब्ल्यू फ्लायकॅचर, डार्त फ्रंटेड बार्बर, यलो ब्रॉवड बुलबुल आणि स्क्वेअर टेल बुलबुल यासारख्या प्रजाती दुर्मिळ होत चालल्या आहेत.

First Published on: February 19, 2020 10:10 AM
Exit mobile version