CoronaVirus: चिंतेत भर! मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे २१८ नवे रुग्ण!

CoronaVirus: चिंतेत भर! मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे २१८ नवे रुग्ण!

चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईची परिस्थिती अजूनच चिंताजनक झाली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोना २१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९९३ पोहोचला आहे. तसंच मुंबईत आज कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६४वर पोहोचला आहे. १० मृतांपैकी नऊ जणांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत लॉकडाऊनचे नियम कठोर केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज पहिल्यांदा मुंबईतील रुग्णांची संख्या वाढली आहे.  मुंबईत दादर, माहिम, प्रभादेवी, धारावी, चेंबूर या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील २८ हजार २४३ इमारतीच्या परिसरात १० एप्रिलपर्यंत निर्जंतुकीकरण्यात करण्यात आलं आहे. तसंच पालिकेच्या शोध मोहिमेनुसार ४ हजार २८ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ३८२ जणांच अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामधील काही जणांना लक्षणे नसली तरी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.


हेही वाचा – दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दोन महिला करोनाबाधित, रुग्णांना घरी सोडण्याचे आदेश!


 

First Published on: April 10, 2020 7:46 PM
Exit mobile version