ठाण्याच्या शीळ डायघर रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

ठाण्याच्या शीळ डायघर रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

अपघात

ठाण्याचा घोडबंदर रोड हा रस्त्यावरील खड्ड्याने मृत्यूचा सापळा झाला आहे. याच रस्त्याच्या खड्ड्याने यापूर्वीच एका चिमुकल्याचा बळी घेतला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच बाईकवरून जाणाऱ्या दाम्पत्याची बाईक खड्डयात गेल्याने खाली पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रेलर गेला होता. तर चिमुरडी ही ट्रेलर खाली सापडल्याने या अपघातात मृत्युमुखी पडली होती. मायलेकींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आठवडाही उलटला नाही तोच मुंब्रा डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्याने २२ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याचा घोडबंदर रोड, डायघर शीळ फाटा आणि मुंब्रा बायपास रोड हे मृत्यूचे सापळे झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत पावणाऱ्या घटनांची वाढती संख्या पाहता आता रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकी चालकांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टेम्पो चालक मालकावर गुन्हा दाखल

भरधाव डंपरच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री शिळडायघर परिसरात घडली. मुंब्रा येथीस तन्वरनगर येथे असिम सिद्दीकी, असे या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या सोबत दुचाकीवर बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. रस्त्यावरील खड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असीमचे पिता जावेद सिद्दीकी यांनी केला आहे. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; जावेद सिद्दीकी यांचा मुलगा असीम हा मंगळवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शिळ परिसरात गेला होता. शिळ-डायघर येथील रस्त्यावर अगणित खड्डे पडले असून या परिसरात नेहमीच अवजड वाहनांची रिघ लागलेली असते. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरची धडक दुचाकीला बसल्याने असीम आणि त्याचा मित्र खाली पडून जखमी झाले. यात डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या असीमला तातडीने मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी सकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. असीम याचे वडील जावेद सिद्दीकी यांनी रस्त्यावरील खड्यामुळे मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी 


 

First Published on: October 16, 2019 8:29 PM
Exit mobile version