Corona In Mumbai: २४ तासांत १,१७३ रूग्णांना डिस्चार्ज; ४३ जणांचा मृत्यू

Corona In Mumbai: २४ तासांत १,१७३ रूग्णांना डिस्चार्ज; ४३ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ३८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७८ हजार २७५ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ८ हजार ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

 

मृत झालेल्या रुग्णांपैकी ३१ रूग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यापैकी ३२ रुग्ण पुरुष आणि ११ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखाली होते. तर २८ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित १३ रूग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत एकूण २६ हजार ६३२ रुग्ण उपचार घेत असून दुप्पटीचा दर हा ५५ दिवस असून १० सप्टेंबर १६ सप्टेंबर दरम्यान कोविड वाढीचा दर १.२६ टक्के इतका आहे.

राज्यात २४,६१९ नव्या रुग्णांचे निदान

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २४,६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११,४५,८४० झाली आहे. राज्यात ३,०१,७५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.


Corona in Maharashtra: चिंताजनक! राज्यात २४,६१९ नव्या रुग्णांचे निदान; ३९८ जणांचा मृत्यू
First Published on: September 17, 2020 9:58 PM
Exit mobile version