मास्क न वापरल्याने २६ लाख मुंबईकरांना दंड – महापालिका आयुक्त

मास्क न वापरल्याने २६ लाख मुंबईकरांना दंड – महापालिका आयुक्त

मास्क न वापरल्याने २६ लाख मुंबईकरांना दंड - महापालिका आयुक्त

मुंबईत सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्वांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मुंबईत मात्र त्याचे पालन होताना दिसत नाहीय. मास्क न वापरल्याने मुंबईत तब्बल २६ लाख लोकांकडून दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्याबाबत जनजागृती करण्यासाठी माझे कुटुंब माझी,माझी जबाबदारी ही प्रमुख योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राबवली. मात्र तरीही मुंबईकरांनी यावर पाणी फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

विनामास्क घराबाहेर पडल्यास महापालिकेकडून आधी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र कोरोनाची परिस्थिती आणखीच बिकट होत गेल्यानंतर नव्या नियमावलीनुसार, विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात आला. नागरिकांनी मास्क वापरुन स्वत: ची काळजी घ्यावी, कोरोनाविषयी जनगागृती व्हावी यासाठी मुंबईत अनेक महत्त्वाचा योजना राबवल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही त्यातीलच एक महत्त्वाची योजना आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करेल असा त्यामागचा उद्देश होता. मात्र तरीही कोरोनाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे.

राज्याप्रमाणेच मुंबईतही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण प्रसंगात कोणतीही मोठी समस्या उद्भवू नये यासाठी मुंबई महापालिकेने मिशन मोड हाती घेतले. त्यानुसार ऑक्सिजन पुरवठादार आणि उत्पादकांनीही मिशन मोडची जबाबदारी घ्यावी असे आदेशही मुंबईच्या आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईप्रमाणेच राज्याची परिस्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.


हेही वाचा – रेमडेसिवीरसाठी अजूनही वणवण सुरुच – महापौर किशोरी पेडणेकर

First Published on: April 20, 2021 3:48 PM
Exit mobile version