कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; २६८ नवे रुग्ण, तर २६४ मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; २६८ नवे रुग्ण, तर २६४ मृत्यू

कोरोना व्हायरस

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज २६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

१० हजार ४८ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १० हजार ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

असे आढळले नवे रुग्ण

कल्याण (पू) : ४२
कल्याण (प): ६७
डोंबिवली (पू) : १०१
डोंबिवली (प) : ४७
मांडा-टिटवाळा : ०५
मोहना : ०५
पिसवली : ०१


हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू


 

First Published on: July 21, 2020 9:42 PM
Exit mobile version