कोरोनामय वातावरणात ३० टक्के नालेसफाई

कोरोनामय वातावरणात ३० टक्के नालेसफाई

मुंबईत एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवत आहे. अशा कोरोनामय वातावरणातही मुंबई महापालिकेने नालेसफाईची ३०% कामे पूर्ण केली आहेत. यासंदर्भातील माहिती, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

पावसाळा दोन महिन्यांनी सुरू होणार आहे. त्यापूर्वी मुंबईतील लहान, मोठ्या नाल्यांची व मिठी नदी आणि अन्य नद्यांची सफाई कामे होणे गरजेचे असते. त्याअनुषंगाने मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामांना काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली होती. पावसाळ्यापूर्वी जर नालेसफाईची कामे वेळेत पार पडली नाहीत तर पावसाळ्यात नाले, नद्या या तुंबून ओव्हरफ्लो होतात. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचून त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. नागरिकांनाही त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळेच मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्याच्या दीड – दोन महिने अगोदर नालेसफाईच्या कामांना सुरुवात करते. आतापर्यंत पालिकेने नेमलेल्या कंत्राटदारांनी, शहर भागात – २४.२४ टक्के, पूर्व उपनगर भागात – ३५.८६ टक्के आणि पश्चिम उपनगरे भागात – २८.१८ टक्के एवढी नालेसफाईची कामे पार पाडली आहेत. मुंबईत नालेसफाईची सरासरी ३० टक्के इतकी कामे पार पडली आहेत.

 

First Published on: April 8, 2021 10:40 PM
Exit mobile version