कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ३३० नवे रुग्ण, आतापर्यंत ३०७ रुग्णांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ३३० नवे रुग्ण, आतापर्यंत ३०७ रुग्णांचा मृत्यू

कोरोना विषाणू

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ३३० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ३०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

१२ हजार ३६५ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १२ हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

असे आढळले नवे रुग्ण

सदर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी टाटा आमंत्रा येथून १२४ रुग्ण, वै. ह.भ.प. सावळाराम महाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून १६ रुग्ण, बाज. आर.आर. रुग्णालयातून १२ रुग्ण आणि हॉलीक्रॉस येथून २ रुग्णांनी कोरोनावप मात केली आहे. उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा – भारतीय रेल्वेत जगजीवन राम हॉस्पिटलने मारली बाजी; ७८ टक्के रिकव्हरी रेट!


 

First Published on: July 26, 2020 7:47 PM
Exit mobile version