ग्रामीण भागात आजही ४० टक्के मुली उघड्यावर जातात सौचाला

ग्रामीण भागात आजही ४० टक्के मुली उघड्यावर जातात सौचाला

Nanhi kali

नन्ही कली प्रकल्पान्वये भारतात पहिल्यांदाच किशोरवयीन मुलींचं आयुष्य कसं असतं हे सांगणारं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. भारतातील ३० राज्यांमधील साधारण ६०० जिल्ह्यात ७४ हजार किशोरवयीन मुलींचं सर्वेक्षण यानिमित्ताने करण्यात आले आहे. भारतामध्ये सध्या ८० दशलक्षापेक्षा अधिक किशोरवयीन मुली आहेत. मात्र, त्यापैकी बर्‍याच मुलींना सुरक्षितता, सन्मान याबाबत नक्की काय वाटतं अथवा शिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सहजपणे मिळते का याबाबत शंका आहेत.

नन्ही कली प्रकल्पाने नांदी फाऊंडेशनच्या सहाय्याने याबाबत अहवाल सादर केला आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेले काही महत्त्वाचे मुद्दे

१) सध्या ८१ टक्के किशोरवयीन मुली शिक्षण घेत असून सर्वाधिक संख्या आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील मुली चांगला अभ्यास करत आहेत. तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १०० मुलींनी आपण अभ्यास सोडून दिला असल्याचे सांगितले आहे

२) ग्रामीण मुलींपैकी ७८ टक्के मुली शिक्षण घेत असून हे प्रमाण शहरामध्ये ८७ टक्के इतके दिसून आले आहे

३) ९६ टक्के किशोरवयीन मुली या अविवाहित असून शहरी आणि ग्रामीण मुलींमध्ये अगदी थोडीच तफावत आहे

४) ७० टक्के मुलींना उच्चशिक्षण घ्यायचे असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तर, ७४ टक्के मुलींना शिक्षण संपवून करिअर करायचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे

५) शहरी मुलींमध्ये ८०.२ टक्के तर ग्रामीण मुलींमध्ये ७१.८ टक्के करिअरची महत्त्वाकांक्षा असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे

६) ग्रामीण आणि शहरी भागात साधारण ७३ टक्के मुलींना वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचे आहे असेही समोर आले आहे

आरोग्य आणि स्वास्थ्याबाबत अहवाल

१) ग्रामीण भागात आजही ४० टक्के मुली उघड्यावर शौचाला जातात

२) दरम्यान ४६ टक्के मुली मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ साहित्य वापरतात. तर, ग्रामीण मुलींपैकी केवळ ४६.३ टक्के मुलींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छ साहित्य उपलब्ध असते

३) दोनपैकी एका किशोरवयीन मुलीला रक्तक्षय अर्थात अ‍ॅनिमिया असतो, ही सध्याची चिंताजनक बाब आहे

४) तर दोनपैकी एका मुलीला बॉडी मास इंडेक्स अर्थात बीएमआय कमी असतो

कशा प्रकारे झाले सर्वेक्षण

सर्वेक्षण साधने आणि संबंधित कागदपत्रे ही १२ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली. त्यानंतर सर्वेक्षण करणार्‍यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येक प्रश्नाची ओळख करून देण्यात आली. प्रश्न विचारण्यामागची कारणे आणि पद्धतही शिकवण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन टॅबवर ही सर्व माहिती गोळा करण्यात आली. एक हजार महिला सर्वेक्षकांच्या टीमने सर्व देश पालथा घालत भारताच्या ३० राज्यांमधील ६०० जिल्ह्यातील ७४ हजार किशोरवयीन मुलींची भेट घेतली. डिजीटल पद्धतीने फॉर्म भरून घेतल्यामुळे अहवाल बनवणे सोपे झाले.

First Published on: October 26, 2018 12:07 AM
Exit mobile version